Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती नगरपरिषदेच्या अत्याधुनिक सीवर सक्शन-जेटिंग-डीवॉटरिंग मशीनचे लोकार्पण..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती नगरपरिषदेच्या अत्याधुनिक सीवर सक्शन-जेटिंग-डीवॉटरिंग मशीनचे लोकार्पण..!

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि:२३): बारामती शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बारामती नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या अत्याधुनिक कंबाईंड सीवर सक्शन, जेटिंग व डीवॉटरिंग मशीनचे लोकार्पण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते (दि:२३) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे पार पडले.

सुमारे १ कोटी रुपये किमतीचे हे अत्याधुनिक मशीन स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे असून, शहरातील खोल मॅनहोल, भूमिगत गटारे, सिव्हर लाईन, सेप्टिक टाक्या आणि आपत्कालीन पाणी उपसा यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. राज्य शासनाच्या “मॅनहोलकडून मशीनहोलकडे” या योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या या मशीनमुळे आता स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून गटारात उतरावे लागणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वच्छता अधिक सुरक्षित, जलद आणि प्रभावीपणे केली जाणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित करत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्धार व्यक्त केला. बारामतीच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन या अत्याधुनिक मशीनसाठी नगराध्यक्ष सचिन सातव, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही सुविधा बारामतीला उपलब्ध झाली.

या प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, आरोग्य प्रमुख स्वरूप आहिवळे, आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे, उपमुख्याधिकारी तथा वाहन विभाग प्रमुख योगिता दरेकर, नगरसेवक संजय संघवी, अमर धुमाळ, विशाल हिंगणे, आरती शेंडगे, अनुप्रिता डांगे-ताबे, प्रवीण माने, राजेंद्र सोनवणे, गोरख पारसे, अविनाश निकाळजे, सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, समीर चव्हाण, अक्षय डांगे, योगेश नाळे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :

“स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना अधिक दर्जेदार स्वच्छता सेवा देणे, हा शासनाचा प्राधान्यक्रम आहे. बारामतीच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबतीत शासन सकारात्मक राहील.”

            सुनेत्रा अजितदाद पवार

      (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.)

—————————

चौकट :

“आदरणीय स्वर्गीय अजितदादांनी बारामतीमध्ये स्वच्छतेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी बारामतीला ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिली. यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल, कामाची गती वाढेल आणि बारामतीची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम बनेल.”

              सचिन सातव

(नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद.)

———————–

चौकट :

“बारामतीच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक मशीनची आवश्यकता आम्ही सातत्याने मांडली. आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी तातडीने निर्णय घेत बारामतीला ही सुविधा उपलब्ध करून दिली. ही मशीन म्हणजे केवळ एक यंत्र नसून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि आधुनिक, सक्षम बारामतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

                नवनाथ बल्लाळ

(आरोग्य सभापती बारामती नगरपरिषद.)

————————-

चौकट :

“बारामती नगरपरिषदेची वाढती व्याप्ती, सिव्हर यंत्रणेचा विस्तार आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता अत्याधुनिक कंबाईंड सीवर सक्शन, जेटिंग व डीवॉटरिंग मशीनची आवश्यकता होती. नगराध्यक्ष श्री. सचिन सातव आणि आरोग्य सभापती श्री. नवनाथ बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी सकारात्मक निर्णय घेत ही अत्याधुनिक सुविधा बारामतीला उपलब्ध करून दिली. या मशीनमुळे स्वच्छता कामांची गुणवत्ता, गती आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढणार असून नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा देता येणार आहे.”

                 पंकज भुसे

(मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!