Homeताज्या बातम्यागणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे

संपादक : सुरज देवकाते 

बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती सर्वांगीण विकास आघाडीच्या गटनेत्या आरती शेंडगे यांनी अनियमितता व घोटाळ्याचे आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देताना बारामती नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती श्वेता योगेश नाळे यांनी गणवेश खरेदी प्रक्रियेत कोणताही घोटाळा झालेला नसल्याचे स्पष्ट केले. गणवेशांच्या गुणवत्तेबाबत समितीच्या पाहणीत काही त्रुटी आढळल्या असून, त्याबाबत १७ सप्टेंबर रोजी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. तसेच शासनाच्या समितीकडूनही गणवेशांची तपासणी करण्यात येत असून, प्रयोगशाळेच्या अहवालानंतर त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नाळे यांनी सांगितले.

आरती शेंडगे या बारामती सर्वांगीण विकास आघाडीच्या गटनेत्या असून, त्यांच्या गटात दोन नगरसेवक आहेत. त्या विरोधी पक्षनेत्या असल्याचे सिद्ध करणारे जिल्हाधिकाऱ्यांचे कोणतेही अधिकृत पत्र त्यांच्याकडे नसल्याचा दावा श्वेता नाळे यांनी केला आहे.

नगरपरिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान काही शाळांमध्ये गणवेशाबाबत त्रुटी आढळून आल्या. त्याबाबतचा अहवाल व पत्रव्यवहार १७ सप्टेंबर रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आला, अशी माहिती नाळे यांनी दिली.

गणवेशाच्या गुणवत्तेबाबत अधिकृत तपासणी व्हावी, यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निर्देशानुसार शासकीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने नगरपरिषदेच्या १ ते १७ शाळांमधील गणवेशांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तसेच गणवेशांचे नमुने एकत्रित करून ते शासनमान्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

शासनमान्य प्रयोगशाळेच्या अहवालात गणवेशांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासह त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नाळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गणवेश खरेदीसंदर्भातील सर्व निविदा प्रक्रिया प्रशासनामार्फत नियमानुसार आणि इन-कॅमेरा पद्धतीने करण्यात आल्याचे नाळे यांनी सांगितले. संबंधित कंत्राटदाराला अद्याप कोणतेही बिल अदा करण्यात आलेले नसल्याने, या प्रक्रियेत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

गणवेशाच्या गुणवत्तेबाबत प्रशासन व शिक्षण समितीने गांभीर्याने दखल घेतली असून, शासनमान्य प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश मिळणे ही नगरपरिषदेची जबाबदारी असून, गुणवत्तेत त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही श्वेता नाळे यांनी सांगितले.

“गणवेश खरेदी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. गणवेशाबाबत काही त्रुटी निदर्शनास आल्याने त्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. शासनमान्य प्रयोगशाळेच्या अहवालात त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल. संबंधित कंत्राटदाराला अद्याप कोणतेही बिल अदा करण्यात आलेले नाही.”

— श्वेता योगेश नाळे
(उपनगराध्यक्षा तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती, बारामती नगरपरिषद)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

अजितदादांच्या जयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप :सुरज देवकाते यांचा उपक्रम..!

बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसंपर्क...

गणेशोत्सवात डीजेचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; होलार समाज युवा प्रतिष्ठान व SK GROUP...

दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपक्रमाची सुरुवात; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संपादक : सुरज देवकाते बारामती : गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचा खर्च केवळ...

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानातून काशिविश्वेश्वर तरुण मंडळाचा आरोग्यसेवेचा उपक्रम..!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समन्वयातून उपक्रम; नागरिकांना आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन संपादक : सुरज देवकाते बारामती : श्री...

error: Content is protected !!