१०५ नागरिकांनी घेतला लाभ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
प्रतिनिधी : सुरज देवकाते
बारामती, (दि. २२) : दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मधील रुई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये परिसरातील तब्बल १०५ नागरिकांनी विविध आजारांची तपासणी करून मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे यानी माध्यमांना बोलताना दिली.
सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय सल्ला तसेच औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण इंगळे, नगरसेविका धनश्री बांदल, नगरसेविका संपदा चौधर, रुई ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. पटेल, खलाटे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉ. राधेय खलाटे, जिल्हा सरचिटणीस प्रा. अजिनाथ चौधर, माजी युवकाध्यक्ष अविनाश बांदल, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस नवनाथ आबा चौधर, जनसंपर्क अधिकारी (PRO) सुरज देवकाते, प्रमोद कांबळे, मच्छिंद्र चौधर, अमर घाडगे, पांडुरंगतात्या चौधर, लक्ष्मण चौधर, किशोर सावंत, अरविंद भोसले, कांतिलाल दराडे, आकाश साळुंखे, पोपट साळुंखे, अनिकेत घाडगे यांच्यासह रुई ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरासाठी रुई ग्रामीण रुग्णालय, खलाटे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल तसेच महालॅब यांचे विशेष सहकार्य लाभले. सहभागी नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठी संबंधित संस्थांनी मोलाचे योगदान दिले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओंकार महाडीक, रोहित भागवत, रोहित चौधर, सागर चौधर, माऊली चौधर, शुभम घाडगे, सोहम घाडगे आणि रोहित कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकाध्यक्ष अभिजीत घाडगे यांनी केले. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांसह विविध स्तरांतून स्वागत करण्यात आले असून… रुई गावातील पुढील नगरसेवक तुमीच पाहिजे असे नागरिकांकडून बोलला जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















