Homeताज्या बातम्यागणेशोत्सवात डीजेचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; होलार समाज युवा प्रतिष्ठान व...

गणेशोत्सवात डीजेचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; होलार समाज युवा प्रतिष्ठान व SK GROUP चा सामाजिक उपक्रम..!

दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपक्रमाची सुरुवात; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

संपादक : सुरज देवकाते

बारामती : गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचा खर्च केवळ मनोरंजनावर न करता त्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श होलार समाज युवा प्रतिष्ठान व SK GROUP यांच्या वतीने घालून देण्यात आला. डीजेवरील खर्च टाळून त्या रकमेतून बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उत्सवामध्ये डीजेचा खर्च टाळून त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन वह्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे.
या कार्यक्रमास नगरसेवक गोरख पारसे, पत्रकार अनिल सावळे पाटील, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत काळे, पत्रकार सुरज देवकाते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

या सामाजिक उपक्रमासाठी होलार समाज युवा प्रतिष्ठान व SK GROUP च्या वतीने बालाजी गुळवे, आर्यन गोरे, वीर काळे, ओंकार गोरे, प्रथमेश जाधव, सुजल गुळवे, राहुल गुळवे आणि गणेश गोरे यांनी पुढाकार घेतला. गणेशोत्सवातील डीजेचा खर्च टाळून तोच निधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याकरिता वापरण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आयोजकांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक व अभिनंदन केले. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा हा उपक्रम इतर गणेश मंडळांसाठीही प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

अजितदादांच्या जयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप :सुरज देवकाते यांचा उपक्रम..!

बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसंपर्क...

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानातून काशिविश्वेश्वर तरुण मंडळाचा आरोग्यसेवेचा उपक्रम..!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समन्वयातून उपक्रम; नागरिकांना आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन संपादक : सुरज देवकाते बारामती : श्री...

error: Content is protected !!