Homeताज्या बातम्याखासदार पार्थ अजितदादा पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे...

खासदार पार्थ अजितदादा पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे होणार..!

संपादक : सुरज देवकाते

कोल्हापूर (दि:२४)- खासदार पार्थ अजितदादा पवार यांच्या विवाहासंदर्भात समाजात व्यक्त होत असलेल्या धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी पूज्य शंकराचार्यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले व त्याच ठिकाणी विवाहाच्या तारखेची व ठिकाणाची माहिती दिली.

समाजामध्ये कुटुंबातील वडिलांचे किंवा आईचे निधन झाल्यानंतर, कुटुंबात जर लग्नकार्य होणार असेल तर, एका वर्षाच्या आत विवाह करणे आवश्यक असते अन्यथा पुढील ३ वर्ष घरात लग्नकार्य करता येत नाही अशी यासंदर्भात बसमजूत प्रचलित आहे. या संदर्भात करवीर पीठाचे शंकराचार्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.करवीर शंकराचार्य पीठाचा छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संदर्भ असल्याने या लग्नकार्याच्या संबंधित प्रचलित रूढी,परंपरा तथा समजूती संदर्भात वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शन घेण्यात आले.

याबाबत माहिती देताना श्री उमेश पाटील म्हणाले की, शंकराचार्यांनी स्पष्ट केले आहे की, कुटुंबातील वडिलांचे निधन झाले असले तरी धर्मशास्त्रानुसार आवश्यक ते विधी व संस्कार योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे असते.परंतु एका वर्षाच्या आत विवाह करणे बंधनकारक नसते. त्यामुळे या संदर्भात कोणताही गैरसमज ठेवण्याचे कारण नाही.

दरम्यान, खासदार पार्थ अजितदादा पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी जुलै २०२६ या महिन्याच्या २९ तारखेला अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या व फक्त निमंत्रित यांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडणार आहे.

तसेच, पार्थ पवार यांच्या होणाऱ्या वधूचे नाव “कायनात दारा” असून त्या मूळच्या चंदीगड येथील आहेत व सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. मागील काही दिवसांपासून काही माध्यमांमध्ये त्यांच्या जन्म ठिकाणा संदर्भात व नावाच्या संदर्भात चुकीची, त्रुटी पुर्ण व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी या उद्देशाने ही अधिकृत माहिती देण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!