Homeताज्या बातम्याबारामतीत स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद..!

बारामतीत स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद..!

एक हजारांहून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान; समाजसेवेच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक

प्रतिनिधी : सुरज देवकाते

बारामती, दि. १९ : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शारदा प्रांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये एक हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी केला. रक्तदान शिबिर दरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार युवा नेते जय पवार यांनी भेट दिली.

शिबिराच्या प्रारंभापासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी झाली होती. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त भावनेतून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवक-युवतींची संख्याही लक्षणीय होती. महिलांचाही सहभाग उल्लेखनीय राहिल्याने संपूर्ण परिसर समाजसेवेच्या वातावरणाने भारावून गेला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जयदादा पवार, पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोळेकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील सोमानी, नगराध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, माजी पुणे जिल्हाध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमानी, माजी नगराध्यक्षा भारती मुथा, दूध संघाचे चेअरमन किशोर फरतरे, तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्यासह आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, प्रसिद्ध व्यापारी किशोर सराफ, नगरसेविका धनश्री बांदल, सविता जाधव, अश्विनी सातव, मंगल जगताप, अनुप्रिता डांगे, रूपाली मलगुंडे, नगरसेवक निलेश इंगुले, गोरख पारसे, नवनाथ बल्लाळ, बिरजू मांढरे,अल्ताफ सय्यद, विष्णुपंत चौधर, गणेश जोजारे, राहुल वाघोलीकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे, पुणे जिल्हा सरचिटणीस प्रा. आजिनाथ चौधर, नगरसेवक विशाल हिंगणे,अमर धुमाळ, यशपाल पोटे यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी,शहर कार्यकारणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय पथक आणि रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, सामाजिक संस्था, वैद्यकीय पथक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजहिताचे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Oplus_16908288

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिरातून समाजसेवेचा आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. एक हजारांहून अधिक रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

—————————

महिनाभर सामाजिक उपक्रमांची मालिका

“दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने बारामतीमध्ये महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महारक्तदान शिबिर हा त्यातील प्रमुख उपक्रम ठरला. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा स्व. अजितदादा पवार यांच्या समाजसेवेच्या विचारांवरील विश्वासाचे प्रतीक आहे. आगामी काळातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.”

                    — ॲड. किरण इंगळे

          शहराध्यक्ष, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!