Homeताज्या बातम्याबारामतीतील ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल..! नेमकं काय लिहिलंय पत्रात ? पाहा...

बारामतीतील ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल..! नेमकं काय लिहिलंय पत्रात ? पाहा सविस्तर…!

बारामती पोरकी झाली; नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी,आणि प्रशासनातील मनमानीबाबत नागरिकांमध्ये नाराजी बारामतीकरांचे पवार कुटुंबीयांना पत्र..!

संपादक : सुरज देवकाते 

बारामती : बारामतीतील वाढती गुन्हेगारी, नगरपरिषदेचा कारभार आणि प्रशासनातील कथित  मनमानीबाबत पवार कुटुंबीयांचे लक्ष वेधणारे एक पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रातून बारामतीकरांनी आपल्या विविध समस्या मांडत पवार कुटुंबीयांनी बारामतीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

“दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे,” अशी भावना या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच बारामतीतील सामान्य नागरिक अनेक प्रश्नांना सामोरे जात असून, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.

काय लिहीले आहे पत्रामध्ये पहा…

आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुनेत्रावहिनी, आदरणीय सुप्रियाताई, पार्थदादा, जयदादा, युगेंन्द्रदादा,जरा बारामतीकडेही लक्ष द्दया, ही नम्र  विनंती. दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे, आज बारामतीतील सामान्य नागरिक अनेक प्रश्नांना सामोरे जात आहे. नगरपरिषदेचा कारभार अत्यंत असमाधानकारक पद्धतीने सुरू असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. एखादा हुकुमशहा ज्या पद्धतीने सत्ता चालवतो, त्याच पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चालवला जात असल्याचे चित्र दिसत आहे. बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढत आहे, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे आणि सर्व काही एका व्यक्तीच्या नियंत्रगात असल्यासारखा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा आहे. बारामती ही केवल एक राजकीय जागा नाही; ती शरद पवार साहेबांनी आणि पवार कुटुंबांने वर्षानुवर्षे घडवलेली विश्वासाची भुमी आहे. म्हणुनच पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांना विनंती आहे की, बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. जनतेचा आवाज ऐका…असे पत्र लिहीले आहे.

दरम्यान, हे पत्र नेमके कोणी लिहिले आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सोशल मीडियावर या पत्राची मोठी चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!