Homeताज्या बातम्यालग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल..!

संपादक : सुरज देवकाते 

बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन देऊन विश्वास संपादन करणे, दीर्घकाळ सहजीवन ठेवून लैंगिक शोषण करणे, आर्थिक फसवणूक करणे, धमक्या देणे व मुलीचा स्वीकार करण्यास नकार देणे अशा गंभीर स्वरूपाच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रमेश मोहन जाधव, व्यवसाय पोलीस हवालदार, खडकी, पुणे, मूळ (रा. निंभोरे, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. कुर्डुवाडी) याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.  अन्वये दिनांक २७ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व्यवसायाने वकील असून सन २०२४ मध्ये न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने आरोपीचा तिच्याशी संपर्क आला. सुरुवातीला न्यायालयीन प्रकरणाच्या कारणाने संवाद सुरू झाल्यानंतर आरोपीने सातत्याने मोबाईलवर संपर्क ठेवत, फोन, संदेश व वैयक्तिक संवादाच्या माध्यमातून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर स्वतःचे पहिले वैवाहिक जीवन संपुष्टात आले असून पत्नीपासून अनेक वर्षे विभक्त राहत असल्याचे सांगून फिर्यादीशीच कायदेशीर विवाह करणार असल्याचे वारंवार आश्वासन दिले. “तूच माझी होणारी पत्नी आहेस”, “आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही”, “आपण कायदेशीर विवाह करू” अशी भावनिक आश्वासने देत आरोपीने तिचा पूर्ण विश्वास संपादन केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

त्यानंतर दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी बारामती येथे आला. आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगून त्याने फिर्यादीकडून ४० हजार रोख रक्कम घेतली. त्याच दिवशी आरोपीने फिर्यादीला बारामती येथील एका लॉजमध्ये नेले. तेथे पुन्हा विवाहाचे आश्वासन देऊन तिची फसवणूक करत प्रथमच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेनंतर आरोपीने आपल्या नातेवाईकांसह फिर्यादीच्या घरी जाऊन विवाहाबाबत चर्चा केली. त्यामुळे आरोपीचे आश्वासन खरे असल्याचा फिर्यादीचा विश्वास अधिक दृढ झाला. काही दिवसांनी आरोपीने एका मंदिरात फिर्यादीच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातील साखळी मंगळसूत्र म्हणून घालून “आता तू माझी कायदेशीर पत्नी आहेस” असे सांगितले. त्यानंतर जेऊर व निंभोरे परिसरात फिर्यादीला पत्नी म्हणूनच परिचय करून देत काही काळ तिच्यासोबत सहजीवन केले, अशी फिर्यादीची तक्रार आहे.

सहजीवनादरम्यान फिर्यादी गर्भवती राहिली. गर्भधारणेनंतर आरोपीचे वर्तन बदलले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिची कोणतीही शारीरिक, मानसिक अथवा आर्थिक जबाबदारी स्वीकारली नाही. उलट संशय घेऊन वाद घालणे, मानसिक त्रास देणे, आवश्यक उपचारासाठी मदत न करणे तसेच गर्भधारणेदरम्यान तिला एकटीला सोडून देणे अशा प्रकारे वागणूक दिली. २० डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादीला कन्यारत्न प्राप्त झाले. सदर मुलगी आरोपीपासून झालेली असून तोच तिचा जैविक पिता असल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. मात्र मुलीच्या जन्मानंतरही आरोपीने मुलीला स्वीकारण्यास नकार दिला. तिची भेट घेतली नाही, संगोपनासाठी कोणतीही आर्थिक मदत केली नाही तसेच फिर्यादीशी अपमानास्पद व अश्लील भाषेत संवाद साधत तिला वारंवार मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपीने विविध वेळा तिच्याकडून तसेच तिच्या नातेवाईकांकडून रोख व ऑनलाईन स्वरूपात आर्थिक व्यवहार केले. त्यातील मोठा हिस्सा अद्याप परत करण्यात आलेला नसून आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय आरोपीने वेळोवेळी “तक्रार मागे घे”, “तडजोड करू”, “गुन्हा दाखल करू नकोस” अशा प्रकारे दबाव टाकला. तसेच अश्लील व अपमानास्पद भाषा वापरत धमक्या दिल्याचाही फिर्यादीचा आरोप आहे.

या प्रकरणात तपासादरम्यान मोबाईल कॉल रेकॉर्डिंग, कॉल डिटेल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट, संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ, बारामती येथील लॉजची नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, मंदिरातील सीसीटीव्ही, जेऊर व निंभोरे येथील साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय उपचार व प्रसूतीचे अभिलेख, आर्थिक व्यवहारांचे बँक रेकॉर्ड तसेच इतर डिजिटल व दस्तऐवजीय पुरावे जप्त करून त्यांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे.

सदर गुन्ह्याचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू असून सर्व तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक व दस्तऐवजीय पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष व सखोल तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाबाबत कोणाकडेही उपयुक्त माहिती किंवा पुरावे असल्यास त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तपासात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

error: Content is protected !!