Homeताज्या बातम्यादिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप..!

संपादक सुरज देवकाते

बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा क्रमांक १ मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन तसेच विविध शालेय साहित्याचे वितरण तसेच खाऊ वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधता येते आणि विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हीच दिवंगत अजितदादा पवार यांना खरी आदरांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमास नगराध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, नगरसेवक सोमनाथ गजाकस, विशाल हिंगणे, गणेश जोजारे, ज्येष्ठ नेते बळवंत माने, बाळासाहेब जाधव, रामचंद्र गोरे, पत्रकार सुरज देवकाते, हिरामण माने, निवृत्ती गोरे, सभापती मोरे, सनी आवटे, बालाजी गुळवे तसेच शाळेचे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास, शिस्त आणि परिश्रम यांच्या जोरावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्ताविका व आभार सुरज देवकाते यांनी मानले. उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!