Homeक्राईम“अपघात नव्हे तर जिवे मारण्याचा प्रयत्न; पीडित कुटुंबाची आरोपींवर कठोर कारवाईची मागणी”

“अपघात नव्हे तर जिवे मारण्याचा प्रयत्न; पीडित कुटुंबाची आरोपींवर कठोर कारवाईची मागणी”

जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलीस प्रशासनाकडे तक्रार..!

संपादक : सुरज देवकाते 

बारामती (दि३१) : बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील रहिवासी सुनील लालासाहेब मासाळ यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याकडे दिलेल्या तक्रारीत, आपल्यावर आणि कुटुंबीयांवर नियोजनबद्ध पद्धतीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अन्वये जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, सुनील मासाळ यांचे गावातील काही व्यक्तींशी शेतजमिनीच्या कारणावरून वाद सुरू आहेत. २७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर तक्रार देण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना आरोपींनी चारचाकी वाहनातून पाठलाग करून मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात सुनील मासाळ यांना हात, पाय तसेच शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्या भावालाही दुखापत झाली आहे. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, संबंधित पोलीस ठाण्यात या घटनेची केवळ अपघात म्हणून नोंद करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ अपघात नसून आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून जिवे मारण्याच्या उद्देशाने वाहनाची धडक दिली. त्यामुळे संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन या तक्रारीची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पीडित कुटुंबाने न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!