Homeक्राईमसोनगावातील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई; ६० हजारांचे...

सोनगावातील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई; ६० हजारांचे रसायन जप्त..!

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई; हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे रसायन व साहित्य नष्ट

संपादक सुरज देवकाते

बारामती (दि. १६) : बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ६० हजार रुपये किमतीचे ६०० लिटर रसायन जप्त केले असून तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ जून रोजी दुपारी बारामती तालुका पोलिसांनी सोनगाव (ता. बारामती) येथे छापेमारी केली. यावेळी करिना अनिकेत भोसले हिच्या राहत्या घराच्या आडोशाला सुरू असलेल्या हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे २० हजार रुपये किमतीचे २०० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन जप्त करण्यात आले. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८२/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी संजिवनी मजनू भोसले हिच्या घराशेजारी असलेल्या दारू अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत सुमारे ४० हजार रुपये किमतीचे ४०० लिटर रसायन जप्त करण्यात आले. तिच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २८३/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दि. १४ जून रोजी सकाळी एमआयडीसी बारामती परिसरातील गोदरेज कंपनीच्या आडोशाला एक व्यक्ती देशी दारूची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून नागेश प्रकाश चंदनशिवे (रा. दुर्गा टॉकीजजवळ, बारामती) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५६० रुपये किमतीच्या ९० मिली मापाच्या १४ सिलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८१/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, सुरेंद्र वाघ, खारतोडे, एकसिंगे, राजश्री आटोळे, निलेश वाकळे, सौरभ तुपे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात बारामती तालुका पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

error: Content is protected !!