लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन
संपादक : सुरज देवकाते
बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी व्हावे या उदेशयाने बारामती नगरपरिषद चे मा. उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे व नगरसेविका प्रतिभा विजय खरात यांच्या संयुक्त विद्यमानाणे सुरू केलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी बारामती नगरपरिषद चे नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, ज्येष्ठ नेते किरण गुजर, बहुजन समाज पार्टीचे सचिव काळूराम चौधरी, एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, नगरसेवक अभिजीत चव्हाण, अभिजीत जाधव,निलेश इंगुले, सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, नवनाथ बल्लाळ, गोरख पारसे, नगरसेविका धनश्री बांदल, मंगला किर्वे, शर्मिला ढवाण, मंगल जगताप, अश्विनी सातव, सारिका वाघमारे, भारती शेळके, सविता जाधव, प्रतिभा खरात, एमआयएम चे फयाज शेख, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, मा. युवक अध्यक्ष अविनाश बांदल, साधू बल्लाळ ,पत्रकार बांधव तसेच सर्व पक्ष्याचे प्रतिनिधी व मातंग एकता आंदोलन चे पदाधिकारी उपस्थितीत होते.
रशियात शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या विषयावर प्रा मनोज वाबळे यांचे व्याख्यान संपन्न झाले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा सत्कार आदी कार्यक्रम संपन्न झाले. सचिन सातव, काळूराम चौधरी, जय पाटील, शुभम अहिवळे,जालिंदर सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले.
स्व अजित दादा पवार यांचा निधनाचा दुखवटा असल्याने जयंती मोठ्या स्वरूपात न करता व्याख्यान,वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न करत असल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले.
डॉ, बाबासाहेब आंबेडकर वसाहत रहिवासी संघ,साईच्छा सेवा ट्रस्ट,श्रीहरी भाऊ तेलंगे मित्र परिवार, भाऊसाहेब मांढरे सामाजिक संस्था, लहुजी वस्ताद दहीहंडी मंडळ,च्या कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















