Homeताज्या बातम्याबारामतीत राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी..!

बारामतीत राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी..!

  • फुलांची सजावट, भव्य रांगोळी, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषाने परिसर दुमदुमला

संपादक : सुरज देवकाते

बारामती, (दि:३१) : राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बारामती शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान, बारामतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

जयंतीनिमित्त चौकाची आकर्षक फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती. तसेच संपूर्ण परिसरात विविध रंगांच्या रांगोळ्या काढून पिवळ्या ध्वजांनी चौक सजविण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे तसेच चौकपाटीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अहिल्यादेवींच्या नावाचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत केलेले लोककल्याणकारी कार्य, न्यायप्रिय प्रशासन, धर्मसंरक्षण तसेच समाजहितासाठी दिलेले योगदान यांचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास जी. बी. गावडे, विनोद पवार, निलेश धालपे, अमोल लेंढे, वसंत घुले, सनी देवकाते पाटील, संदीप चोपडे, अमोल सातकर, नवनाथ मलगुंडे, सुळ महाराज, संपतभाऊ टकले, गोरख रुपनवर सर, मंगेश मासाळ, शेखर हुलगे, पंकज देवकाते, भिवा मलगुंडे, नागेश कासार, पोपटराव धवडे, नरसिंह कुलकर्णी, अमोल सोनवणे, जगदीश कोळेकर, चव्हाण सर, ॲड दिलीप धायगुडे, उदय कुलकर्णी, सचिन गडदे, ॲड. सचिन सोलंनकर, राहुल धालपे, सोनू बुरुंगले, शरद सुळ यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, बारामतीतील कार्यक्रमानंतर राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र चौंडी येथे दर्शन व जयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वाहनांचा भव्य ताफा रवाना झाला. या सोहळ्यामुळे बारामती शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान, बारामतीच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे पार पाडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!