सोमवारच्या दौऱ्यात जय पवार यांची विविध गावांमध्ये उपस्थिती राहणार.
संपादक : सुरज देवकाते
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आता वेग येणार असून, युवा नेते जय अजितदादा पवार हे सोमवार, (दि. ५) ऑक्टोबर २०२६ रोजी सोमेश्वर परिसरातील प्रचार दौऱ्यात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना पुरस्कृत श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
जय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवसभर विविध गावांमध्ये मतदार, शेतकरी सभासद आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
असा आहे जय पवार यांचा प्रचार दौरा..
पिसर्वे – सकाळी ८ वाजता
नाझरे खुर्द – सकाळी ९ वाजता
नाझरे सुपे – सकाळी १० वाजता
जवळार्जुन – सकाळी ११ वाजता
राहू – दुपारी १२ वाजता
गुळुंचे – सायंकाळी ४ वाजता
नीरा – सायंकाळी ५ वाजता
पिंपरे खुर्द – सायंकाळी ६ वाजता
वाल्हे – सायंकाळी ७ वाजता
जेजुरी – रात्री ८ वाजता
या दौऱ्यात सर्व सन्माननीय सभासद, शेतकरी बंधू-भगिनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















