Homeताज्या बातम्याबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025’ मध्ये मानाचा तुरा..उपमुख्यमंत्री...

बारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025’ मध्ये मानाचा तुरा..उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन

‘अ’ वर्ग बसस्थानकांमध्ये बारामतीचा राज्यात प्रथम क्रमांक; १ कोटींचे बक्षीस जाहीर.

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि:२९ ) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात बारामती बसस्थानकाने “अ” वर्गामध्ये ९७ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. याबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आगारातील चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ अंतर्गत ‘अ’ वर्ग बसस्थानकांच्या स्पर्धेमध्ये बारामती बसस्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. स्वच्छता, शिस्त, उत्कृष्ट नियोजन आणि प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा यामुळे बारामती बसस्थानकाने संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशामुळे बारामतीकरांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून बारामती बसस्थानकाच्या कार्याचे कौतुक होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बारामती बसस्थानकाला राज्य शासनाकडून रुपये १ कोटींचे बक्षीस तसेच स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. दिनांक १ जून २०२६ रोजी मुंबई येथे मा. परिवहन मंत्र्यांच्या हस्ते गौरव सोहळा पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली. या यशामध्ये बसस्थानकातील चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी तसेच पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे मानले जात आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व सुबक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण कर्मचारी वर्गाने सातत्याने परिश्रम घेतल्यानेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

बारामती बसस्थानक हे केवळ एक प्रवासी केंद्र नसून आदर्श व्यवस्थापन, स्वच्छता आणि आधुनिक सुविधांचा उत्कृष्ट नमुना ठरले आहे. आदरणीय अजितदादांच्या विकासदृष्टीतून साकारलेल्या या प्रकल्पाने आज संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. बारामती अधिक सुंदर आणि आदर्श व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये बसस्थानकाचा हा सन्मान विशेष मानला जात आहे.

या यशामध्ये अजितदादांची दूरदृष्टी, कामाप्रती असलेली निष्ठा आणि बारामतीबद्दलचे प्रेम स्पष्टपणे दिसून येत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे हा सन्मान केवळ बसस्थानकापुरता मर्यादित नसून संपूर्ण बारामतीच्या विकास मॉडेलला मिळालेली गौरवाची पावती असल्याचे बोलले जात आहे. बारामती बसस्थानकाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून नागरिकांनीही आनंद व्यक्त केला आहे.

स्वच्छता, शिस्त, नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचा आदर्श उभा करणारे बारामती बसस्थानक हे केवळ एक प्रकल्प नाही, तर आदरणीय अजितदादांच्या स्वप्नांचा आणि विकासदृष्टीचा जिवंत नमुना आहे. बारामती अधिक सुंदर आणि आदर्श व्हावी, यासाठी त्यांनी पाहिलेलं हे स्वप्न आज संपूर्ण राज्यासमोर आदर्श ठरत आहे. या यशामध्ये दादांची दूरदृष्टी, कामाप्रती असलेली निष्ठा आणि बारामतीबद्दलचं अपार प्रेम स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे हा सन्मान म्हणजे केवळ बसस्थानकाचा गौरव नसून, अजितदादांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कार्याला मिळालेली खरी पोचपावती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!