Homeताज्या बातम्याबारामतीतील त्या..भ्रष्टाचार प्रकरणाला नवे वळण; सोहेल शेख यांच्यावर खोटा FIR दाखल केल्याचा...

बारामतीतील त्या..भ्रष्टाचार प्रकरणाला नवे वळण; सोहेल शेख यांच्यावर खोटा FIR दाखल केल्याचा आरोप

‘सत्यासाठीची लढाई सुरूच राहणार’ :  सोहेल शेख यांची भूमिका स्पष्ट..!

प्रतिनिधी : सुरज देवकाते

बारामती, प्रतिनिधी : बारामती नगर परिषदेमधील कथित भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणणारे  सोहेल शेख यांनी आपल्या विरोधात राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच नगर परिषद प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर आपल्यावर दबावतंत्राचा वापर सुरू असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

सोहेल शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी भूसे तसेच दरेकर मॅडम  यांच्याविरोधात कोट्यवधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराबाबत त्यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत नगर परिषद संचालनालयाचे आयुक्त यांनी अधिकृत चौकशी व आवश्यक कारवाईचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे सत्य आणि संविधानाचा विजय झाल्याचे शेख यांनी नमूद केले.

मात्र, या प्रकरणानंतर आपल्यावर दबाव आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय शक्तींचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नगर परिषद अधिकारी सचिन खोरे यांच्याशी झालेल्या वादानंतर आपण त्यांच्याविरोधात एनसीआर दाखल केली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस प्रशासनावर दबाव आणून आपल्याविरोधात खोटा एफआयआर दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

शेख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एफआयआरमध्ये नमूद केलेले शिवीगाळ व धमकीचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. या कारवाईचा खरा उद्देश म्हणजे नगर परिषदेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी उचललेला आवाज दाबणे हा आहे. भ्रष्टाचार प्रकरणात तक्रार मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

घटनेच्या दिवशीचा संपूर्ण व्हिडिओ आणि संबंधित पुरावे आपण सोशल मीडियावर सार्वजनिक करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एफआयआरमधील आरोप आणि प्रत्यक्ष घडलेली घटना यातील फरक नागरिक व पत्रकार बांधवांसमोर येईल, असे ते म्हणाले. यापूर्वीही आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करत, न्याय आणि सत्यासाठीची लढाई सुरूच ठेवणार असल्याचे शेख यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांच्या बळावर भ्रष्टाचाराविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाची सखोल दखल घेऊन सत्य जनतेसमोर आणावे, अशी विनंतीही त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसविरोधात एल्गार; उपमुख्यमंत्री सुनेत्रवहिनी पवार यांच्या बाबतच्या वक्तव्याचा तीव्र निषेध.!

संपादक : सुरज देवकाते  बारामती: (दि. ४): राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेत स्थळावरील करण्यात आलेल्या वक्तव्य व त्या वक्तव्याबाबत काँग्रेसच्या...

बारामतीतील भिगवन चौकात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; पृथ्वीराज चव्हाणांचा जाहीर निषेध.. संपादक : सुरज देवकाते बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री...

मांग-गारुडी समाज संघटनेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजाने जपावा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे प्रतिपादन. संपादक : सुरज देवकाते बारामती : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मांग-गारुडी समाज...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

error: Content is protected !!