Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बारामती शहरासह तालुक्यातील २३ पाणीपुरवठा योजनांचा आढावा..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बारामती शहरासह तालुक्यातील २३ पाणीपुरवठा योजनांचा आढावा..!

बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती; टप्पा-१ हस्तांतरण, टप्पा-२ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासह साठवण तलाव दुरुस्तीचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश..!

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि:२४): बारामती शहर व परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, परिणामकारक आणि दीर्घकालीन स्वरूपाची करण्याच्या दृष्टीने जळोची व तांदुळवाडी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून बारामती नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

बारामती शहर पाणीपुरवठा योजनेसह तालुक्यातील २३ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी आज विधान भवन येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे यांच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे, बारामती नगरपालिकेचे गटनेते संजय संघवी तसेच नगरसेवक अल्ताफ सय्यद उपस्थित होते.

बैठकीत बारामती शहरातील जळोची-तांदुळवाडी पाणीपुरवठा योजना व शहर पाणीपुरवठा योजना टप्पा-१ अंतर्गत पूर्ण झालेली कामे तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून बारामती नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. तसेच बारामती शहर पाणीपुरवठा योजना टप्पा-२ मधील प्रलंबित कामे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही गतीने करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बारामती शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या साठवण तलावामध्ये आढळून आलेली गळती तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. पाणीपुरवठा व्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेत आवश्यक तांत्रिक उपाययोजना तत्काळ राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. यावेळी बारामती तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यातील एकूण २३ पाणीपुरवठा योजनांपैकी प्रशासकीय मान्यता प्राप्त योजनांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून नागरिकांना शाश्वत, दर्जेदार व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. बारामती शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणी गरजांचा विचार करून दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कामांना गती देणे गरजेचे असल्याचे नमूद करत, नागरिकांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि वेळबद्ध पद्धतीने कार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसविरोधात एल्गार; उपमुख्यमंत्री सुनेत्रवहिनी पवार यांच्या बाबतच्या वक्तव्याचा तीव्र निषेध.!

संपादक : सुरज देवकाते  बारामती: (दि. ४): राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेत स्थळावरील करण्यात आलेल्या वक्तव्य व त्या वक्तव्याबाबत काँग्रेसच्या...

बारामतीतील भिगवन चौकात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; पृथ्वीराज चव्हाणांचा जाहीर निषेध.. संपादक : सुरज देवकाते बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री...

मांग-गारुडी समाज संघटनेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजाने जपावा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे प्रतिपादन. संपादक : सुरज देवकाते बारामती : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मांग-गारुडी समाज...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

error: Content is protected !!