Homeताज्या बातम्यापिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला...

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप..!

संपादक : सुरज देवकाते

बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामती येथे सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव आणि भाजपचे नेते अविनाश दादा मोटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

जयंतीनिमित्त आयोजित विशेष उपक्रमात बारामती नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक संवेदनशीलता आणि कृतज्ञतेची भावना जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

यावेळी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, अल्ताफ सय्यद, मुनिरभाई तांबोळी, फैय्याज शेख, जे. बी. आण्णा गावडे, पत्रकार संतोष जाधव, पत्रकार सुरज देवकाते, पिंटू गायकवाड, अभिजित पवार, गोविंद देवकाते, शहाजी कदम, मुकेश वाघेला, राजेश कांबळे, चंद्रकांत केंगार, ॲड. आकाश दामोदरे, प्रमोद डिंबळे, रघू चौधर, नितीन शेलार, राहुल मदने, सारिका ताई लोंढे, रसिका पंडित, विजया खोमणे, माजी महिला शहराध्यक्ष अनिताताई गायकवाड, उषा भोसले, सुलताना पठाण, निशा भिसे, प्रियांका मोरे, पूर्वा शेलार, सविता भोई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन पिंकीताई मोरे युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी केले. अण्णाभाऊ साठे यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार समाजात सातत्याने व्हावा, असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

error: Content is protected !!