Homeताज्या बातम्याअजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ.

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे अध्यक्ष तथा बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक गणेश जोजारे यांच्या पुढाकाराने शिक्षकांसाठी ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांच्या लेखनकौशल्याला चालना देणे, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि वैचारिक अभिव्यक्तीसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ही निबंध स्पर्धा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री आ. सातव हायस्कूल, बारामती येथे होणार असून शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ विजेत्यांनाही बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याने शिक्षकांमध्ये या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.या उपक्रमासाठी बारामतीचे नगराध्यक्ष सचिनशेठ सातव हे मार्गदर्शक म्हणून लाभले असून सोमनाथ गजाकस तसेच बारामती नगरपरिषदेतील सर्व समविचारी नगरसेवकांचे विशेष सहकार्य लाभत आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश मोहन जोजारे, उपाध्यक्ष संजय नाना निंबाळकर, सचिव संजय बबन धुमाळ आणि खजिनदार परशुराम आप्पा वाकळे हे आयोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

तसेच श्रीकांतशेठ झोरे व प्रतीक जोजारे हे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत असून, डॉ. सचिन साखरे (एमआयटी कॉलेज, पुणे) आणि श्री. विठ्ठल जोरी हे सहमार्गदर्शक म्हणून या उपक्रमाला मार्गदर्शन करणार आहेत.

सिद्धिविनायक फाउंडेशनच्या या अभिनव उपक्रमातून शिक्षकांना विचार मांडण्याची आणि लेखनातून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याची संधी मिळणार असून, स्पर्धेला बारामतीसह परिसरातील शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!