Homeताज्या बातम्या४० वर्षांपासून प्रलंबित विकासकामांसाठी स्वीकृत नगरसेवक सोमनाथ गजाकस आक्रमक...!

४० वर्षांपासून प्रलंबित विकासकामांसाठी स्वीकृत नगरसेवक सोमनाथ गजाकस आक्रमक…!

योगाभवन विस्तार, संत वीरशैव कक्कय्या महाराजांचा अर्धपुतळा, मारुती मंदिराचे जीर्णोद्धार, वाचनालय व समाजमंदिर उभारणीसह आठ प्रमुख मागण्या सभागृहात..!

संपादक : सुरज देवकाते 

बारामती, (दि. २३) : जवाहरनगर परिसरातील गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या विविध समाजोपयोगी विकासकामांबाबत स्वीकृत नगरसेवक सोमनाथ गजाकस यांनी बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिक तसेच कक्कय्या ढोर समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांना तातडीने मंजुरी देऊन मार्गी लावण्याची मागणी त्यांनी नगराध्यक्ष सचिनशेठ सातव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जवाहरनगर येथील विद्यमान योगाभवनाचे विस्तारीकरण करून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, तसेच या कामामध्ये आकर्षक मेघडंबरी उभारून कक्कय्या ढोर समाजाचे आराध्यदैवत महाप्रसादी श्री संत वीरशैव कक्कय्या महाराज यांचा अर्धपुतळा स्थापित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सन १९७५ मध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या जवाहरनगर येथील मारुती मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात यावा. तसेच मंदिरामागील बाजूस योग्य नियोजन करून परिसर मोकळा करण्यात यावा आणि धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त व सुसज्ज सभामंडप उभारण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा असलेली अभ्यासिका व सार्वजनिक वाचनालय उभारणे, कक्कय्या ढोर समाजाच्या विविध उपक्रमांसाठी “कक्कय्या भवन समाज मंदिर” उभारणे, जवाहरनगर परिसरातील सर्व रस्त्यांचे किमान सहा मीटर रुंदीकरण करून दर्जेदार डांबरीकरण करणे, विद्यमान योगाभवनास “महाप्रसादी श्री संत वीरशैव कक्कय्या महाराज योगाभवन” असे नामकरण करणे तसेच देसाई इस्टेट परिसरातील ढोर कॉलनी शाळेचे नाव बदलून “बा.न.प. कक्कय्या महाराज विद्यालय” असे करण्याची मागणीही नगरसेवक गजाकस यांनी केली.

या सर्व मागण्या समाजहित, शैक्षणिक प्रगती, धार्मिक श्रद्धा आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असून, त्यावर सकारात्मक विचार करून आवश्यक प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विकासकामांना अखेर गती मिळावी, अशी अपेक्षा जवाहरनगर परिसरातील नागरिक आणि कक्कय्या ढोर समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसविरोधात एल्गार; उपमुख्यमंत्री सुनेत्रवहिनी पवार यांच्या बाबतच्या वक्तव्याचा तीव्र निषेध.!

संपादक : सुरज देवकाते  बारामती: (दि. ४): राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेत स्थळावरील करण्यात आलेल्या वक्तव्य व त्या वक्तव्याबाबत काँग्रेसच्या...

बारामतीतील भिगवन चौकात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; पृथ्वीराज चव्हाणांचा जाहीर निषेध.. संपादक : सुरज देवकाते बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री...

मांग-गारुडी समाज संघटनेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजाने जपावा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे प्रतिपादन. संपादक : सुरज देवकाते बारामती : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मांग-गारुडी समाज...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

error: Content is protected !!