Homeताज्या बातम्याबारामती नगरपरिषदेकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भव्य स्मारकाला एकमताने मंजुरी; ५० मीटर...

बारामती नगरपरिषदेकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भव्य स्मारकाला एकमताने मंजुरी; ५० मीटर उंचीचा टॉवर ठरणार प्रमुख आकर्षण..!

तीन मजली संग्रहालय, जनता दरबाराची प्रतिकृती आणि ५० मीटर उंचीच्या टॉवरमधून दिसणार बारामतीच्या विकासाचा आलेख

संपादक : सुरज देवकाते 

बारामती (दि. २३) : बारामती नगरपरिषदेच्या मंगळवारी (दि. २३) झालेल्या सर्वसाधारण सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भव्य स्मारक उभारणीच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. बारामतीच्या विकासाचा इतिहास आणि अजित पवार यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास पुढील पिढ्यांसमोर मांडणारे हे स्मारक अत्याधुनिक स्वरूपात उभारण्यात येणार असून, त्यामध्ये ५० मीटर उंचीच्या स्मारकस्तंभासह तीन मजली संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

नगराध्यक्ष सचिन सातव यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, प्रशासकीय भवनाशेजारील जागेत उभारण्यात येणाऱ्या स्मारकातील ५० मीटर उंचीच्या टॉवरवरून बारामती शहराचा सर्वांगीण विकास अनुभवता येणार आहे. अजित पवार यांच्या विकासदृष्टी आणि राजकीय उंचीप्रमाणेच या स्मारकस्तंभाची उंचीही बारामतीतील सर्वाधिक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्मारक परिसरात तीन मजली अत्याधुनिक म्युझियम उभारण्यात येणार असून, त्यामध्ये अजित पवार यांना विविध मान्यवरांकडून प्राप्त झालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचे जतन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जनसंपर्काची ओळख असलेल्या ‘जनता दरबार’ची प्रतिकृतीही येथे उभारली जाणार आहे. अजित पवार यांच्या जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंतचा जीवनप्रवास दृकश्राव्य माध्यमांच्या साहाय्याने उलगडण्यात येणार असून, त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक कार्याचा इतिहास भावी पिढ्यांसाठी जतन केला जाणार आहे.

बारामतीत येणाऱ्या प्रत्येक नागरिक आणि पर्यटकाला प्रेरणा मिळावी, तसेच अजित पवार यांचे कार्य आणि विकासाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अत्यंत भव्य आणि आकर्षक असे हे स्मारक उभारण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतल्याचे सभेत नमूद करण्यात आले. दरम्यान, विविध नगरसेवकांनीही या स्मारकासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. स्वच्छता हा अजित पवार यांचा आवडता विषय असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतचा त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करावी तसेच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्यात यावी, अशा मागण्या नगरसेवकांनी सभागृहात केल्या.

उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक या बैठकीस उपस्थित होते. अजित पवार यांचे स्मारक हा सर्व बारामतीकरांसाठी भावनिक आणि अभिमानाचा विषय असून, या प्रकल्पाला तातडीने मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सभागृहास दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसविरोधात एल्गार; उपमुख्यमंत्री सुनेत्रवहिनी पवार यांच्या बाबतच्या वक्तव्याचा तीव्र निषेध.!

संपादक : सुरज देवकाते  बारामती: (दि. ४): राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेत स्थळावरील करण्यात आलेल्या वक्तव्य व त्या वक्तव्याबाबत काँग्रेसच्या...

बारामतीतील भिगवन चौकात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; पृथ्वीराज चव्हाणांचा जाहीर निषेध.. संपादक : सुरज देवकाते बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री...

मांग-गारुडी समाज संघटनेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजाने जपावा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे प्रतिपादन. संपादक : सुरज देवकाते बारामती : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मांग-गारुडी समाज...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

error: Content is protected !!