Homeताज्या बातम्यास्मशानभूमी आरक्षणावर नगरपरिषद सभेत चर्चा; संपदा चौधर यांनी मांडला विषय, विष्णुपंत चौधर...

स्मशानभूमी आरक्षणावर नगरपरिषद सभेत चर्चा; संपदा चौधर यांनी मांडला विषय, विष्णुपंत चौधर यांचा दफनभूमी आरक्षणाला विरोध..!

रुई येथे स्मशानभूमीसाठी संपदा चौधर परिवाराकडून १४ गुंठे जागा; गट नं. १०० व १०१ मधील दफनभूमी आरक्षणाला विष्णुपंत चौधर यांचा विरोध.

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि:२३): बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील मौजे बारामती ग्रामीण आणि मौजे रुई येथील मंजूर विकास आराखड्यामधील प्रस्तावित स्मशानभूमी व दफनभूमीसाठी आरक्षित जागांचे शासनाच्या विविध तरतुदींनुसार भूसंपादन करण्याबाबतचा विषय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आला. यावेळी नगरसेविका संपदा चौधर यांनी हा विषय सभागृहात मांडत परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन स्मशानभूमीची व्यवस्था करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

रुई गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागेची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन नगरसेविका संपदा चौधर यांच्या परिवाराच्या वतीने तब्बल १४ गुंठे जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना भविष्यात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मत सभागृहात व्यक्त करण्यात आले. दरम्यान, वाढीव हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मधील गट क्रमांक १०० आणि १०१ येथे प्रस्तावित दफनभूमी आरक्षणाबाबत काही सदस्यांनी आक्षेप नोंदविले. यावेळी नगरसेवक विष्णुपंत चौधर यांनी संबंधित ठिकाणी दफनभूमी करण्यात येऊ नये, तसेच हा विषय पुढील विचारासाठी तहकूब करण्यात यावा, अशी भूमिका सभागृहात मांडली.

सदर विषयावर सभागृहात विविध सदस्यांनी आपली मते व्यक्त केली. नागरिकांच्या भावना, भविष्यातील विकास आराखडा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले. स्मशानभूमी व दफनभूमी आरक्षणाचा प्रश्न हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असल्याने याबाबत सर्वंकष चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

नगरपरिषद हद्दवाढीनंतर वाढलेल्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुविधा उभारणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र प्रस्तावित दफनभूमीच्या ठिकाणाबाबत स्थानिक नागरिकांच्या भावना आणि हरकतींचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सभेत देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसविरोधात एल्गार; उपमुख्यमंत्री सुनेत्रवहिनी पवार यांच्या बाबतच्या वक्तव्याचा तीव्र निषेध.!

संपादक : सुरज देवकाते  बारामती: (दि. ४): राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेत स्थळावरील करण्यात आलेल्या वक्तव्य व त्या वक्तव्याबाबत काँग्रेसच्या...

बारामतीतील भिगवन चौकात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; पृथ्वीराज चव्हाणांचा जाहीर निषेध.. संपादक : सुरज देवकाते बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री...

मांग-गारुडी समाज संघटनेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजाने जपावा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे प्रतिपादन. संपादक : सुरज देवकाते बारामती : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मांग-गारुडी समाज...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

error: Content is protected !!