Homeताज्या बातम्याओट्यावर झोपलेल्या इसमाचा गळा चिरून खून..!

ओट्यावर झोपलेल्या इसमाचा गळा चिरून खून..!

३६ तासांत मारेकरी जेरबंद वरूडे हादरले; जुन्या वादाचा राग मनात धरून अल्पवयीनाकडून रक्तरंजित सूड. 

संपादक : सुरज देवकाते 

शिरूर (दि :१०):  शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर ओट्यावर निवांत झोपलेल्या इसमाचा मध्यरात्री धारदार कोयत्याने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या ३६ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश करत आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

वरूडे येथील रानमळा परिसरातील बाळासो बबन तांबे (वय ४३) हे उकाड्यामुळे घराबाहेरील ओट्यावर झोपले होते. ८ जून रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करत त्यांची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तांबे यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी मयताच्या हालचाली, पूर्वीचे वाद, गावातील संबंध आणि संशयितांची माहिती तपासली. त्यावेळी गावातीलच एका अल्पवयीन मुलाचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याची पालकांसमक्ष चौकशी केली असता त्याने खुनाची धक्कादायक कबुली दिली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवीगाळ व धमकीचा सूड मनात धरून त्याने हा खून केल्याचे तपासात समोर आले. राग अनावर झाल्याने झोपेत असलेल्या तांबे यांच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्यांचा जीव घेतल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून खुनासाठी वापरलेला लोखंडी कोयता जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे व त्यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे.

वरूडे येथील खुनाने संपूर्ण परिसर हादरला असताना शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने दाखविलेली तत्परता विशेष ठरली. कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ तांत्रिक तपास, माहिती संकलन आणि बारकाईच्या चौकशीच्या बळावर पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत आरोपीपर्यंत मजल मारली.

सदरची कामगिरी ही संदिपसिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे  ग्रामीण, शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक पुणे, प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षिरसागर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक शिक्रापूर पोलीस स्टेशन, महेश डोंगरे पोलीस उपनिरीक्षक यांचेसह श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील जनार्धन शेळके, राजु मोमीन, तुषार पंदारे,  संजू जाधव, सागर धुमाळ, शिकापुर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, अमोल नलगे, प्रतिक जगताप, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत यांच े पथकान े केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे...

संपादक : सुरज देवकाते बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

error: Content is protected !!