Homeताज्या बातम्याअजितदादांना अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात; बारामतीत युवक...

अजितदादांना अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात; बारामतीत युवक काँग्रेसकडून वृक्षारोपण..!

खासदार पार्थ पवार व युवानेते जय पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम; बारामती नगर परिषदेचे सहकार्य..

संपादक : सुरज देवकाते

बारामती : (दि:१०) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त बारामती शहर पक्ष कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले. पक्षाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली.

यानंतर राज्यसभा खासदार पार्थ पवार व युवानेते जय पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहरच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवड करून हरित बारामतीचा संकल्प दृढ केला. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत घाडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनिकेत पवार, बारामती लोकसभा कार्याध्यक्ष तुषार लोखंडे, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शुभम ठोंबरे, अविनाश बांदल, शुभम गालिंदे, सूरज काकडे, पै. ओमकार महाडीक, सचिन नगरे, रोहित चौधर, मयूर दराडे, रोहित तपकिरे तसेच कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे ओंकार जाधव उपस्थित होते.

या उपक्रमासाठी बारामती नगर परिषदेचे सहकार्य लाभले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपण अभियानाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे...

संपादक : सुरज देवकाते बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

error: Content is protected !!