Homeताज्या बातम्याप्रशासकीय अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल ; आरोग्य संचालनालयातही तक्रार करणार : नगरसेवक नवनाथ...

प्रशासकीय अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल ; आरोग्य संचालनालयातही तक्रार करणार : नगरसेवक नवनाथ बल्लाळ

बारामती मेडिकल कॉलेजमधील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याचा आरोप

स्टाफ नियुक्ती, उपचारातील हलगर्जीपणा आणि भरतीतील कथित गैरप्रकारांची उपमुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी 

संपादक : सुरज देवकाते 

बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथील स्टाफ भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत तसेच रुग्णसेवेत होत असलेल्या कथित हलगर्जीपणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बारामती नगर परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती व नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नवनाथ बल्लाळ यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बारामती तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने मेडिकल कॉलेज व सर्वोपचार रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. मात्र, रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये बारामती तालुक्यातील पात्र युवकांना डावलून इतर तालुक्यांतील उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, नुकत्याच घडलेल्या एका अपघातग्रस्त रुग्णाच्या उपचारप्रकरणात ड्युटीवरील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे उपचारास विलंब झाल्याचा आरोप असून, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच रुग्णालयातील स्टाफ रुग्णसेवेसाठी जबाबदारीने काम करेल, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. भरती प्रक्रियेत आर्थिक देवाण-घेवाण झाल्याच्या चर्चेचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला असून, काही अधिकाऱ्यांच्या मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रियेसंदर्भातील माहिती व कंत्राटी कर्मचाऱ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बारामती तालुक्यातील सर्व समाजातील पात्र युवकांना समान संधी मिळावी, भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी आणि स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही, यासाठी तातडीने योग्य ती चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी नवनाथ बल्लाळ यांनी केली आहे.

या निवेदनाची प्रत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनाही देण्यात आली असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या प्रसंगी नगरसेवक बिरजू मांढरे सदस्य अभ्यंगत मंडळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय बारामती ,माजी नगरसेवक समीर चव्हाण, गौरव अहिवळे. निलेश मोरे, संकेत शिंदे उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे...

संपादक : सुरज देवकाते बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

error: Content is protected !!