Homeताज्या बातम्याबारामतीत दुर्मिळ 'हरियाल' पक्षाला जीवदान; 'ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन'ची कौतुकास्पद कामगिरी

बारामतीत दुर्मिळ ‘हरियाल’ पक्षाला जीवदान; ‘ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन’ची कौतुकास्पद कामगिरी

संपादक : सुरज देवकाते 

बारामती: येथील मोरगाव रस्त्यावरील सोळस्कर वस्ती परिसरात नुकताच महाराष्ट्राचा राज्यपक्षी असलेला दुर्मिळ ‘हरियाल’ (Yellow-footed Green Pigeon) पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. निसर्गाचा हा सुंदर अनमोल ठेवा संकटात असल्याचे पाहताच, बारामतीमधील ‘ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन’च्या टीमने तातडीने धाव घेत या पक्षाला यशस्वीरित्या जीवदान दिले. त्यांच्या या तत्परतेमुळे एका दुर्मिळ पक्षाचे प्राण वाचले असून परिसरात संस्थेचे कौतुक होत आहे.

सर्पमित्र आदित्य पारखे आणि श्लोक माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक या पक्षाचे रेस्क्यू (बचाव) केले. पक्षी जखमी असल्याने त्याला उपचार करण्यात आले.
‘हरियाल’ पक्षाबाबत सविस्तर माहिती देताना संस्थेचे सर्पमित्र अमोल जाधव यांनी सांगितले की, ‘हरियाल’ हा प्रामुख्याने झाडांवर राहणारा पक्षी असून तो कधीही जमिनीवर पाय ठेवत नाही, अशी लोकभावना आहे. हा पक्षी महाराष्ट्राचा ‘राज्यपक्षी’ म्हणून ओळखला जातो. गडद हिरवा आणि पिवळसर रंग असलेल्या या पक्षाचे मुख्य अन्न वडाची आणि पिंपळाची फळे हे असते. पर्यावरण संतुलनात आणि बीजप्रसारात या पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

सध्याच्या काळात वाढत्या शहरीकरणामुळे हे पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनने केलेल्या या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे बारामतीच्या पर्यावरण वर्तुळातून संस्थेचे आणि सर्पमित्रांचे विशेष आभार मानले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसविरोधात एल्गार; उपमुख्यमंत्री सुनेत्रवहिनी पवार यांच्या बाबतच्या वक्तव्याचा तीव्र निषेध.!

संपादक : सुरज देवकाते  बारामती: (दि. ४): राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेत स्थळावरील करण्यात आलेल्या वक्तव्य व त्या वक्तव्याबाबत काँग्रेसच्या...

बारामतीतील भिगवन चौकात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; पृथ्वीराज चव्हाणांचा जाहीर निषेध.. संपादक : सुरज देवकाते बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री...

मांग-गारुडी समाज संघटनेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजाने जपावा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे प्रतिपादन. संपादक : सुरज देवकाते बारामती : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मांग-गारुडी समाज...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

error: Content is protected !!