Homeताज्या बातम्याअजितदादांच्या स्मारकावरून नगरपरिषदेत राजकारण तापलं, नवनाथ बल्लाळ यांचा नगरसेवकांना सवाल..!

अजितदादांच्या स्मारकावरून नगरपरिषदेत राजकारण तापलं, नवनाथ बल्लाळ यांचा नगरसेवकांना सवाल..!

वादग्रस्त वक्तव्यावेळी गप्प, आता स्मारकासाठी पुढे का? – नवनाथ बल्लाळ यांचा नगरसेवकांवर निशाणा

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि.२३) : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारक उभारणीच्या विषयावर बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा रंगली असताना, या विषयावर बोलण्यासाठी आणि सूचक होण्यासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसून आले. मात्र याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ चे स्थानिक नगरसेवक तथा आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी काही नगरसेवकांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली.

बल्लाळ यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, अजितदादा पवार यांच्याविरोधात पूर्वी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. त्या वेळी अजितदादांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्यासाठी फार कमी जण पुढे आले होते. त्या प्रसंगी केवळ नगरसेवक अमर धुमाळ आणि विशाल हिंगणे यांनी भूमिका घेतली होती. मात्र आज स्मारकाच्या विषयावर पुढाकार घेण्यासाठी अनेक जण पुढे येत असल्याचे दिसत आहे.यावेळी त्यांनी विरोधी पक्षातील नगरसेविका आरती शेडगे तसेच इतर नगरसेवकांनाही थेट प्रश्न विचारला. “जेव्हा अजितदादांबाबत वादग्रस्त वक्तव्य झाले होते, तेव्हा तुम्ही गप्प का बसला होतात? त्या वेळी त्यांचा सन्मान राखण्यासाठी आवाज का उठवला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

स्मारक उभारणीसाठी सूचक होण्याची स्पर्धा सुरू असताना, केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी काही जण पुढाकार घेत असल्याचा आरोपही बल्लाळ यांनी केला. अजितदादांप्रती खरी निष्ठा कृतीतून दिसली पाहिजे, केवळ सभागृहातील भाषणातून नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले.बल्लाळ यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ वातावरण तापले. स्मारकाच्या विषयावरून सुरू झालेली चर्चा नंतर राजकीय भूमिकांवर आणि निष्ठेच्या प्रश्नांवर केंद्रित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही चर्चेला उधाण आले असून, या विषयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसविरोधात एल्गार; उपमुख्यमंत्री सुनेत्रवहिनी पवार यांच्या बाबतच्या वक्तव्याचा तीव्र निषेध.!

संपादक : सुरज देवकाते  बारामती: (दि. ४): राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेत स्थळावरील करण्यात आलेल्या वक्तव्य व त्या वक्तव्याबाबत काँग्रेसच्या...

बारामतीतील भिगवन चौकात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; पृथ्वीराज चव्हाणांचा जाहीर निषेध.. संपादक : सुरज देवकाते बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री...

मांग-गारुडी समाज संघटनेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजाने जपावा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे प्रतिपादन. संपादक : सुरज देवकाते बारामती : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मांग-गारुडी समाज...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

error: Content is protected !!