Homeताज्या बातम्यानगरसेवक किशोर मासाळ यांच्या वक्तव्याविरोधात राजीनाम्याची मागणी; नगरसेवकांचे सह्यांचे निवेदन सादर..!

नगरसेवक किशोर मासाळ यांच्या वक्तव्याविरोधात राजीनाम्याची मागणी; नगरसेवकांचे सह्यांचे निवेदन सादर..!

भावना दुखावल्याचा आरोप; किशोर मासाळ यांच्या राजीनाम्यासाठी नगरसेवक आक्रमक”

संपादक : सुरज देवकाते

बारामती, (दि. ८) : बारामती नगर परिषदेचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह व बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच सहयोगी पक्षांच्या नगरसेवक-नगरसेविकांनी एकत्र येत त्यांच्या नगरसेवक पदाच्या राजीनाम्याची मागणी करणारे सह्यांचे निवेदन आज सादर केले. या घटनेमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून संबंधित वक्तव्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी सर्व नगरसेवकांनी ‘सहयोग’ या निवासस्थानी भेट देत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) सचिन यादव यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.सादर करण्यात आलेल्या निवेदनात अजितदादा पवार यांच्याविषयी करण्यात आलेले वक्तव्य हे बारामतीकरांच्या भावना दुखावणारे असून अशा प्रकारची विधाने कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.बारामतीच्या विकासासाठी अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाची जाणीव संपूर्ण तालुक्याला असून त्यांच्या विरोधात केलेली अपमानास्पद विधाने जनतेच्या भावना दुखावणारी असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, गटनेते संजय संघवी, उपगटनेते संपदा चौधर, प्रतोद विशाल हिंगणे, सभापती अमर धुमाळ, नवनाथ बल्लाळ, जयसिंग देशमुख, सविता जाधव, मनीषा चव्हाण तसेच नगरसेवक जय पाटील, विष्णुपंत चौधर, बिरजू मांढरे, अभिजीत चव्हाण, अभिजीत जाधव, अविनाश निकाळजे, अनुप्रिता डांगे-तांबे, रुपाली मलगुंडे, प्रवीण माने, धनश्री बांदल, भारती शेळके, प्रसाद खारतोडे, पूनम चव्हाण, मनिषा बनकर, सारिका वाघमारे, मंगल किर्वे, मंगल जगताप, गोरख पारसे, शर्मिला ढवाण, अल्ताफ सय्यद, अश्विनी सातव, राजेंद्र सोनवणे, प्रतिभा खरात, अफ्रिन बागवान, दर्शना तांबे, निलेश इंगुळे, सोमनाथ गजाकस, अमोल कावळे, गणेश जोजारे आणि राहुल वाघोलीकर यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.

निवेदनाद्वारे संबंधित नगरसेवकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांनी तात्काळ आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा आणि तो स्वीकारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमुखाने निषेध व्यक्त करत अजितदादा पवार यांच्याविषयी आदर व निष्ठा कायम असल्याची भावना व्यक्त केली.
या घटनेमुळे बारामतीच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तापलेले वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात या प्रकरणावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादांबद्दल बोललेल्या बेताल वक्तव्याचा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर निषेध; ठरावाला एकमुखी मंजुरी..!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसह सर्व सदस्यांचा एकमुखी पाठिंबा; सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त संपादक : सुरज देवकाते बारामती : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी...

हातात सलाईन…जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात आक्रमक भूमिका; आरतीताई शेंडगे यांच्या जिद्दीची चर्चा..!

प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सभागृहात आक्रमक भूमिका; घरपट्टी कपात, पाणी मीटरला विरोध, शास्ती माफीसह अनेक प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. १३)...

बहुजन समाज पार्टीच्या गटनेत्या ॲड. संघमित्रा काळुराम चौधरी यांच्या पुढाकारातून सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे निर्णय..बारामती...

महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी, अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करू नये..! संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. १३) : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात पार...

बारामती नगर परिषद सर्वसाधारण सभा; ७७ पैकी ७५ विषयांना मंजुरी..!

मालमत्ता कर सवलत, नमो उद्यान, हॉकर झोन, ओपन जिमसह विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१२) : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात...

error: Content is protected !!