Homeआरोग्यनीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; बारामतीत एक दिवसाआड पाणीपुरवठा..!

नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; बारामतीत एक दिवसाआड पाणीपुरवठा..!

मर्यादित पाणीसाठ्यामुळे नगरपरिषदेचे नियोजन; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि. १७) : नीरा डावा कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने आणि उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने बारामती शहरासह जळोची, रुई, तांदुळवाडी आणि बारामती ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यामुळे बारामती नगरपरिषदेने पुढील काळात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे.

नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. १८ जून २०२६) पर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार असून त्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाटस रिंगरोड, सायली हिल आणि जळोची येथील जलशुद्धीकरण केंद्रांमार्फत विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार शुक्रवारी (दि. १९ जून) आणि शनिवारी (दि. २० जून) वेगवेगळ्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाटस रिंगरोड जलशुद्धीकरण केंद्राच्या हद्दीतील भागांना फटका.

शुक्रवारी (दि. १९ जून) महाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवके इस्टेट, पाननळी, समर्थनगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, वडार सोसायटी, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर, पोस्ट रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, विजय नगर, साईगणेशनगर, अशोकनगर, आनंदनगर, भिगवण रोड परिसर, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, त्रिरत्न कॉलनी, महादेव मळा, सद्गुरुनगर, मेढद रोड, क्षत्रियनगर, तांदुळवाडी वेस चौक, मारवाड गल्ली, महावीर पथ, नेवसे रोड, सुभाष चौक, कसाब गल्ली व कचेरी रोड या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तर शनिवारी (दि. २० जून) कसबा फळटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड, हनुमान नगर, सातव वस्ती, शिवाजीनगर, जमादार रोड, कारभारी नगर, सावता माळीनगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशील नगर, साठेनगर, जगताप मळा तसेच जुना व नवीन मोरगाव रोड परिसरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सायली हिल आणि जळोची, रुई परिसरातही परिणाम.. 

सायली हिल व जळोची जलशुद्धीकरण केंद्रातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचेही नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. १९ जून) रुई गाव, डेरेवस्ती, सायली हिल, सूर्यनगरी, देसाई इस्टेट, अंबिकानगर, जळोची गावठाण, बावडे वस्ती, तानाजी नगर, महिला सोसायटी आणि प्रगतीनगर येथे पाणीपुरवठा बंद राहील.

शनिवारी (दि. २० जून) तांदुळवाडी गावठाण, सहयोग सोसायटी, नीरा कॅनॉल सोसायटी आणि दूधसंघ सोसायटी या भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. नगरपरिषदेने नागरिकांना आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नीरा डावा कालव्यातील प्रवाह पूर्ववत सुरू होईपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा व्यवस्था कायम राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

अजितदादांच्या जयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप :सुरज देवकाते यांचा उपक्रम..!

बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसंपर्क...

गणेशोत्सवात डीजेचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; होलार समाज युवा प्रतिष्ठान व SK GROUP...

दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपक्रमाची सुरुवात; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संपादक : सुरज देवकाते बारामती : गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचा खर्च केवळ...

error: Content is protected !!