Homeआरोग्यपावसाळी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बारामती नगरपरिषद सज्ज; आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी...

पावसाळी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बारामती नगरपरिषद सज्ज; आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विभागनिहाय संपर्क यादी जाहीर

“उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार आढावा बैठक; प्रशासनाकडून पावसाळी तयारीचा आढावा”

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि:१) : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये तसेच नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी बारामती नगरपरिषद प्रशासनाने सर्वंकष तयारी पूर्ण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या सूचनेनुसार सोमवारी (दि. १ जून) रोजी बारामती नगरपरिषद कार्यालयात पावसाळ्यापूर्व तयारीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नालेसफाई, ड्रेनेज चेंबर स्वच्छता आणि गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पावसाळ्यात शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि रहदारीच्या ठिकाणी पाणी साचणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

              मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देत पावसामुळे नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

                  स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती नवनाथ बल्लाळ यांनी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. बैठकीत शहरातील आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य, अग्निशमन आणि उद्यान विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात पूरस्थिती, झाडे पडणे, पाणी साचणे, नाले तुंबणे अथवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता नगरपरिषदेच्या संबंधित विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन पथक, आरोग्य व स्वच्छता विभाग तसेच उद्यान विभागातील अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले असून तातडीच्या प्रसंगी नागरिकांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदर बैठकीस मुख्याधिकारी पंकज भुसे, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती नवनाथ बल्लाळ, नगरसेवक निलेश इंगुले, आरोग्य विभाग प्रमुख स्वरूप अहिवळे, आपत्ती व्यवस्थापन पथक प्रमुख तथा अग्निशमन विभाग प्रमुख पद्मनाभ कुल्लरवार, स्वच्छता निरीक्षक अजय लालबिगे, प्रभारी अग्निशमन सहाय्यक अधिकारी निखिल कागडा तसेच आरोग्य विभागाचे सर्व मुकादम उपस्थित होते.

बारामती शहरात पावसाळ्यादरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी नगरपरिषद पूर्णपणे सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व विभाग सतत कार्यरत राहतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला

पावसाळी आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक जाहीर…..बारामती शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरपरिषदेने विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आपत्कालीन संपर्क यादी जाहीर केली आहे. मुसळधार पाऊस, पाणी साचणे, झाडे पडणे, स्वच्छतेच्या समस्या, आरोग्यविषयक अडचणी अथवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे…

आपत्ती व्यवस्थापन पथक

पद्मनाभ कुल्लरवार (अग्निशमन अधिकारी) – 9850371260

निखिल कागडा (प्र. सहाय्यक अग्निशमन अधिकारी) – 8975512118

बळवंत झुंज (मदतनीस) – 7620401383

प्रदीप लालबिगे (प्रभारी फायरमन) – 9850034006

आरोग्य व स्वच्छता विभाग

स्वरूप अहिवळे (आरोग्य विभाग प्रमुख) – 9021881212

अजय लालबिगे (स्वच्छता निरीक्षक) – 9421878941

कुणाल बिवाल (प्र. मुकादम, प्रभाग 1 व 2) – 9834230206

रणजित अहिवळे (प्र. मुकादम, प्रभाग 3 व 5) – 9960669536

अक्षय माने (प्र. मुकादम, प्रभाग 4) – 8788748386

अजय माने (प्र. मुकादम, प्रभाग 6) – 7040146416

अक्षय अहिवळे (प्र. मुकादम, प्रभाग 7) – 8956969219

योगेश खंडाळे (प्र. मुकादम, प्रभाग 8 व 9) – 7272020304

पवन रणपिसे (प्र. मुकादम, प्रभाग 10 व 16) – 9604842423

अक्षय बिवाल (प्र. मुकादम, प्रभाग 11 व 15) – 8329822892

प्रतिभा सोनवणे (मुकादम, प्रभाग 12) – 7798982316

युवराज खिराडे (प्र. मुकादम, प्रभाग 13 व 14) – 8830469898

अब्दुल पठाण (प्र. मुकादम, प्रभाग 17 व 18) – 9657210002

समीर तांबोळी (प्र. मुकादम, प्रभाग 19) – 9766506134

राहुल जेधे (प्र. मुकादम, प्रभाग 20) – 8788950251

उद्यान विभाग

योगिता दरेकर (उद्यान विभाग प्रमुख) – 8793009417

महेश चांदगुडे – 9527378668

जमाल शेख – 8668505033

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

error: Content is protected !!