Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा थेट बा.न.प. च्या मुख्याधिकारी यांना फोन.....बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा थेट बा.न.प. च्या मुख्याधिकारी यांना फोन…..बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा….मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संपर्क.

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि. ५) :- बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

वादळी वाऱ्यामुळे बारामती शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली असून काही झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व पडलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी विशेषतः मुळासकट उन्मळून पडलेल्या मोठ्या वृक्षांचे संवर्धन करण्यावर भर देत, अशा झाडांचे मोठ्या क्रेनच्या सहाय्याने स्थलांतर करून आवश्यक ती छाटणी केल्यानंतर त्यांचे पुनर्रोपण करण्याची कार्यवाही तातडीने हाती घेण्यास सांगितले. तसेच आगामी काळात वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता रस्त्यालगतच्या मोठ्या वृक्षांची आवश्यक ती छाटणी करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.     शहरातील तसेच तालुक्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत तहसीलदारांनाही त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या बारामतीतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून, नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

बारामती शहरात आज दिनांक 5 जून 2026 रोजी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली, तसेच काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.या घटनेची माहिती मिळताच बारामती नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष व. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यान्वित करण्यात आले.नगरपालिकेचे आपत्तीव्यवस्थापन पथक,सदस्य/सदस्या यांनी शहरातील सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून तत्काळ शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत मार्गांवर उन्मळून पडलेली मोठी झाडे व तुटलेल्या फांद्या JCB व क्रेनच्या सहाय्याने तत्काळ हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.तसेच शहरात काही ठिकाणी पाणी तुंबलेल्या भागातील गटारांमध्ये अडकलेला कचरा, फांद्या व गाळ काढून पाण्याचा निचरा करण्यात आला.गटारे तात्काळ साफ करण्यात आले.

(मुख्याधिकारी)

बारामती नगरपरिषद, बारामती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

अजितदादांबद्दल बोललेल्या बेताल वक्तव्याचा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर निषेध; ठरावाला एकमुखी मंजुरी..!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसह सर्व सदस्यांचा एकमुखी पाठिंबा; सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त संपादक : सुरज देवकाते बारामती : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी...

हातात सलाईन…जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात आक्रमक भूमिका; आरतीताई शेंडगे यांच्या जिद्दीची चर्चा..!

प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सभागृहात आक्रमक भूमिका; घरपट्टी कपात, पाणी मीटरला विरोध, शास्ती माफीसह अनेक प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. १३)...

बहुजन समाज पार्टीच्या गटनेत्या ॲड. संघमित्रा काळुराम चौधरी यांच्या पुढाकारातून सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे निर्णय..बारामती...

महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी, अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करू नये..! संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. १३) : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात पार...

error: Content is protected !!