Homeताज्या बातम्याबारामती नगरपरिषद शिक्षण विभागाचा गुणवत्तावाढीसाठी नवा संकल्प..!

बारामती नगरपरिषद शिक्षण विभागाचा गुणवत्तावाढीसाठी नवा संकल्प..!

भविष्यात प्रवेशासाठी वेटिंग लिस्ट लागेल अशा दर्जेदार बा.न प च्या  शाळा निर्माण होणार.

संपादक : सुरज देवकाते

बारामती : (दि:१९) बारामती नगरपरिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन व गुणवत्तावाढ आढावा कार्यक्रमास शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात शिक्षण विभागाची भावी दिशा, शाळांमधील गुणवत्तावाढ, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम तसेच शिक्षणातील सकारात्मक बदल यावर सखोल चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव हे उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्षा तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती श्वेताताई नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय चे माजी प्राचार्य चंद्रशेखर मुरूमकर, उपगटनेते संपदा चौधर, विशाल हिंगणे, गोरख पारसे, सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, शर्मिला ढवाण, मंगला किर्वे, अश्विनी सातव, सविता जाधव,विजया खरात, रूपाली मलगुंडे, मनीषा बनकर, संघमित्रा चौधरी,प्रवीण माने,अमोल कावळे, राजेंद्र सोनवणे, निलेश इंगुले, सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, अल्ताफ सय्यद, अविनाश निकाळजे, अभिजीत जाधव तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका, शिक्षण समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व आकांक्षा फाउंडेशन चे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्वेताताई नाळे यांनी प्रस्तावना मांडताना शिक्षण समितीमार्फत मागील काही महिन्यांत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आधुनिक व प्रभावी उपक्रम राबवून नगरपरिषदेच्या शाळांमध्ये दर्जात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यानंतर शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी अक्षय मांडवे यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नगरपरिषद शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमांची माहिती सादर केली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या माजी प्राचार्य चंद्रशेखर मुरूमकर यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांना संबोधित करताना बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थीकेंद्रित शिक्षण प्रणाली, गुणवत्ता विकास, शाळांमधील सकारात्मक वातावरण आणि शिक्षकांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली..मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी आपल्या मनोगतात शिक्षण विभागाच्या प्रगतीसाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा व उपक्रमांना प्रशासनाची भक्कम साथ राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बारामती नगरपरिषद अंतर्गत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व रोप देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात उपस्थित नगरसेवक, नगरसेविका तसेच प्रमुख पाहुण्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी नगराध्यक्ष सचिनशेठ सातव यांनी शिक्षण विभागाच्या आगामी वाटचालीबाबत भूमिका मांडताना बारामती नगरपरिषदेच्या शाळा अत्याधुनिक, गुणवत्तापूर्ण व पालकांच्या पसंतीच्या बनविण्याचा संकल्प व्यक्त केला. “भविष्यात प्रवेशासाठी वेटिंग लिस्ट लागेल अशा दर्जेदार शाळा निर्माण करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त करत शिक्षण क्षेत्रात बारामतीचा वेगळा ठसा उमटविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच आकांक्षा फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी संस्थेची भूमिका व कार्यपद्धती थोडक्यात मांडली. कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहाराने करण्यात आला.

————————————-

🟥 “बारामती नगरपरिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, आधुनिक व विद्यार्थीकेंद्रित शिक्षण देण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिक्षकांचा सहभाग आणि पालकांचा विश्वास याच्या जोरावर येत्या काळात नगरपरिषदेच्या शाळा या गुणवत्तेच्या बाबतीत आदर्श ठरतील.”

            — श्वेताताई नाळे

(उपनगराध्यक्षा तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती, बा. न. प)

🟥 “बारामती नगरपरिषदेच्या शाळा या केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करणारी केंद्रे बनली पाहिजेत. आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून भविष्यात प्रवेशासाठी वेटिंग लिस्ट लागेल अशा दर्जेदार शाळा निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे.”

              सचिन सातव

(नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे...

संपादक : सुरज देवकाते बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

error: Content is protected !!