Homeक्राईमरिव्हॉल्व्हरच्या धाकावर दरोडा : बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई, चार आरोपी जेरबंद

रिव्हॉल्व्हरच्या धाकावर दरोडा : बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई, चार आरोपी जेरबंद

  1. ८ लाख१५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..
बारामती, ता.५ : बनावट फेसबुक अकाउंट वरून स्वस्त दरात गहू देण्याच्या आमिषाने व्यापाऱ्याला जाळ्यात ओढून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत मारहाण करून रोख रक्कम व दागिने लुटणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करत धडाकेबाज कामगिरी केली आहे. सतत बदलणाऱ्या  ठिकाणांचा माग काढला आणि पाच स्वतंत्र पोलिस पथकांचा समन्वय यामुळे ही कारवाई शक्य झाली.
रवी संजय माने (वंजारवाडी, बारामती), श्रीकांत अर्जुन घुले (ढेकळवाडी, बारामती), अभिषेक भाऊसो ठोंबरे (ढेकळवाडी, बारामती), अतुल मोहन भोलणकर (वंजारवाडी, बारामती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तासगाव (जि. सांगली) येथील सूरज सरजेराव गावडे (वय २७) हे गव्हाच्या पिठाच्या व्यवसायात कार्यरत आहेत. फेसबुक मार्केटप्लेसवर “बाजारभावापेक्षा स्वस्त गहू” अशी जाहिरात पाहून त्यांनी संबंधित लिंकवर आपली माहिती भरली. त्यानंतर त्यांना खोट्या फेसबुक अकाउंट वरून फेसबुक ऑडिओ कॉल वरून संपर्क साधण्यात आला आणि बारामती येथे येण्यास सांगण्यात आले. ४ मे २०२६ रोजी गावडे हे आपल्या छोटा हत्ती टेम्पो व चालकासह बारामती येथे पैसे घेऊन दाखल झाले. फोनवरील सूचनांनुसार त्यांना पेन्सिल चौक, त्यानंतर कल्याणी कॉर्नर येथे बोलावण्यात आले. हा संपूर्ण प्रकार नियोजनबद्ध असल्याचे पुढे स्पष्ट झाले. कल्याणी कॉर्नर येथे एक संशयित इसम स्कूटीवर आला. त्याने “शेठने पाठवले आहे” असे सांगून गावडे व त्यांच्या चालकाला गहू दाखवण्याच्या बहाण्याने सोबत नेले. स्कूटीला नंबर प्लेट नव्हती आणि त्या इसमाने चेहऱ्यावर मास्क लावला होता. यानंतर त्यांना पेंजिओ कंपनीच्या मागील बाजूस, पुलाचे काम सुरू असलेल्या परिसरातील निर्जन प्लॉटमध्ये नेण्यात आले. येथे आधीच चारचाकी वेरना गाडी मध्ये इतर आरोपी थांबलेले होते. निर्जन ठिकाणी पोहोचताच आरोपींनी आपला खरा हेतू उघड केला. एका उंच इसमाने हातात पिस्तूल घेत गावडे यांच्या कपाळावर ठेवली, तर दुसऱ्याने चालकाच्या कपाळावर बंदूक रोखली. दोघांनाही शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर आरोपींनी जबरदस्तीने गावडे यांच्या खिशातील २५,५०० रुपये रोख रक्कम काढून घेतली. तसेच त्यांच्या हातातील चांदीच्या दोन अंगठ्या, घड्याळ आणि चालकाच्या कानातील सोन्याची बाळी कटरने काढून घेतली. एकूण सुमारे ५१,५०० रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. “पोलिसांना सांगितले तर जिवे मारू” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक सायंकाळी ५.२५ वाजता तात्काळ रवाना झाले. विशेष म्हणजे, अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींबाबत माहिती पोलिसांनी घेतली.
त्या आधारे एक संशयित असल्याबाबतची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. फिर्यादीला फोटो दाखविल्यानंतर एका आरोपीची ओळख पटली आणि तपासाला वेग आला. सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली. सुरुवातीला आरोपी उंडवडी परिसरात असल्याचे दिसून आले. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही तपासात त्यांची वेरना कार पाटसच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आरोपीं वेळोवेळी रस्ते बदलत राहिले—शिरसुफळ, गाडीखेल, पारवडी, खडकी, रावणगाव, कुरकुंभ, भिगवण, निरगुडे, लाकडी, कळस, डाळज, भाडलवाडी अशा विविध ठिकाणी ते फिरत होते. पोलिसांनी या प्रत्येक ठिकाणी समन्वय साधून जाळे आवळले.
———————–
पोलीस निरीक्षक यादव यांच्याकडून इंदापूर, भिगवण, वालचंदनगर पोलिसांना सतर्क करून रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली. पोलिसांनी आरोपींची गाडी पाहिली; मात्र त्यांनी गाडी न थांबवता पळ काढला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी आरोपींनी गाडीचा वेग आणखी वाढविला. त्यानंतरही पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
———————–
थरारक पाठलाग करून अटक
सिन्नरमास कंपनीजवळ समोरून भिगवण पोलिस आणि मागून वालचंदनगर व बारामती पोलिसांनी घेराव घालत पाठलाग तीव्र केला. अखेर रात्री सुमारे ८.५० वाजता तीन आरोपींना गाडीसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौथा आरोपी अतुल भोलणकर याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ७,५०,००० रु चे सोन्या चांदीचे दागिने, घड्याळ, जिवंत काडतूस सह दोन पिस्तूल, ६५,००० रु रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
———————
बारामती तालुका पोलिसांच्या टीमवर्कची झलक

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीयव पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वालचंदनगर, भिगवण आणि बारामती तालुका पोलिसांसह सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत आरोपींना पकडले. विविध ठिकाणी नाकाबंदी, पाठलाग आणि माहितीची देवाणघेवाण यामुळे ही कारवाई यशस्वी ठरली.

———————

कारवाईत या पथकाचा सहभाग 
ही धडाकेबाज कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, API विक्रम पवार, PSI धनश्री भगत, HC भारत खारतोडे, नितीन ढवण, जितेंद्र शिंदे, शशिकांत दळवी, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, संतोष कांबळे, आफ्रिन शेख, वालचंद नगर पोलीस स्टेशनचे API राजकुमार डूणगे, HC गणेश काटकर, किसान बेलदार, अभिजित कळसकर, विक्रम मोरे, भिगवन पोलीस ठाण्याचे PSI अमित पाटील, HC महेश उगले, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील ASI गोरख पवार आदींचा कारवाई सहभाग होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

अजितदादांच्या जयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप :सुरज देवकाते यांचा उपक्रम..!

बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसंपर्क...

गणेशोत्सवात डीजेचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; होलार समाज युवा प्रतिष्ठान व SK GROUP...

दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपक्रमाची सुरुवात; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संपादक : सुरज देवकाते बारामती : गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचा खर्च केवळ...

error: Content is protected !!