Homeताज्या बातम्यारुईकरांच्या व्यथा सभागृहात; स्मशानभूमी, रस्ते व पथदिव्यांसाठी संपदा चौधर यांची जोरदार मागणी

रुईकरांच्या व्यथा सभागृहात; स्मशानभूमी, रस्ते व पथदिव्यांसाठी संपदा चौधर यांची जोरदार मागणी

पावसाळ्यामुळे गटारी तुडुंब; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, तातडीच्या उपाययोजनांची संपदा चौधर यांच्याकडून मागणी.

संपादक: सुरज देवकाते

बारामती, (दि. १३) : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात शुक्रवारी (दि. १२) रोजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये शहर व वाढीव हद्दीतील नागरिकांशी संबंधित विविध विकासकामांसह एकूण ७७ विषय सादर करण्यात आले. यापैकी ७५ विषयांना मंजुरी देण्यात आली, तर दोन विषयांना नामंजुरी देण्यात आली.

सभेदरम्यान वाढीव हद्दीतील रुई गावातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला. नगरसेविका संपदा चौधर यांनी रुई परिसरातील उघड्या गटारींची गंभीर समस्या सभेच्या निदर्शनास आणून दिली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या गटारी तुडुंब भरून वाहत असून, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सभेत नमूद केले.

रुई गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता परिसरात स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच रुई गावातील डांबरीकरणाचा रस्ता तात्काळ मंजूर करून कामाला सुरुवात करावी, परिसरात आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. याचबरोबर शहरातील विविध भागांमधील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्याचा मुद्दाही त्यांनी सभेत उपस्थित केला. काही भागांमध्ये सांडपाणी व्यवस्थेच्या समस्या निर्माण होत असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने या कामांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली.

सभेमध्ये विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या विकासाशी निगडित बहुसंख्य विषयांना मंजुरी मिळाल्याने आगामी काळात विविध विकासकामांना गती मिळणार असल्याचे मत यावेळी सदस्यांनी व्यक्त केले. वाढीव हद्दीतील भागांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरजही अनेक सदस्यांनी व्यक्त केली. दरम्यान, रुई गावातील उघड्या गटारी, रस्ते, पथदिवे आणि स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधांचे प्रश्न सभेत प्रामुख्याने चर्चिले गेल्याने या समस्यांवर लवकरात लवकर कार्यवाही होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

error: Content is protected !!