Homeसामाजिकझारगडवाडीतील उच्च शिक्षित मुलीने तिचा वाढदिवस स्मशानभूमीत  ५० देशी वृक्ष लावून केला...

झारगडवाडीतील उच्च शिक्षित मुलीने तिचा वाढदिवस स्मशानभूमीत  ५० देशी वृक्ष लावून केला साजरा..!

बारामती तालुक्यातील झारगडवाडीत अनोखा वाढदिवस.

संपादक : सुरज देवकाते

बारामती : वाढदिवस कुठे साजरा करायचा तर तो स्मशानभूमीत साजरा करायचा असा निर्णय उच्चशिक्षित असलेल्या मुलीने घेतला त्याला आई वडील आणि मित्र-मैत्रिणींनी होकार दिला. आणि महत्त्वाचं म्हणजे COMRADE MPSC MENTOR चे सर्व विधार्थी विद्यार्थिनी तसेच संचालक आनंद सावंत यांनी वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील स्मशानभुमी परिसरात एक दोन नव्हे तब्बल 50 देशी प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.. चिंच, पिंपळ, कडूलिंब, वड, करंज, जांबुळ, अशोक, गुलमोहर, नांद्रुक, अशा विविध प्रकारचे झाडे लावून वाढदिवस सामाजिक पद्धतीने साजरा करणाऱ्या आणि सर्वांना प्रेरणा देणाऱ्या मुलीचे नाव आहे दिपाली गोरख बोरकर..

अनेक जण आपला वाढदिवस मोठ मोठ्या हॉटेलमध्ये साजरा करत असताना पहायला मिळते मात्र बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावातील उच्च शिक्षित असलेल्या दिपाली गोरख बोरकर हिने तिचा वाढदिवस झारगडवाडी गावातील स्मशानभूमीत केक कापून नव्हे तर देशी प्रकारची 50 झाडे लावून साजरा केला आहे.. तिने स्वतःच्या वाढदिवसाचा केलेला उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे यामुळे तिचे बारामती तालुक्यात कौतुक होत आहे अशाच प्रकारे इतरांनी देखील आपला वाढदिवस साजरा केला तर नक्कीच पर्यावरणाचे रक्षण होईल असा संदेश देखील समाजापुढे आला आहे..

दीपालीने सांगितले की, “वाढदिवस हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे, परंतु आपण आपले भविष्य आणि पुढील पिढ्यांचा विचार करून दिवसभर टिकणारी देणगी देऊ शकतो – ती म्हणजे वृक्ष.” वाढदिवस साजरा करण्याचे गिफ्ट माझ्या COMRADE MPSC MENTOR चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच संचालक आनंद सावंत यांनी दिले. त्यांच्या संकल्पनेनुसार झारगडवाडी तील स्मशानभूमीत विविध प्रकारचे देशी 50 झाडे लावली आहेत.. कार्यक्रमात सहभागी अनेक तरुणांनी ग्रामस्थांनी वृक्ष रोपणात हातभार लावला त्यांचे मनापासून आभार मानते..

झारगडवाडी ग्रामपंचायत सरपंच अजित बोरकर व ग्रामविकास अधिकारी विशाल घुले यांनी सांगितले की, दीपाली ताईच्या या उपक्रमाचे कौतुक तर आहेच पण तिने गावाच्या हितासाठी स्मशानभूमी मध्ये 50 देशी झाडे लावून हरितीकरण करून दिले त्याबद्दल तिचे अभिनंदन करतो. आता या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांची आहे.. या झाडांना ड्रीप द्वारे पाणी दिले जाईल झाडे मोठी होईपर्यंत झाडांची निगा राखली जाईल.. दीपाली ताई चा हा कार्यक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे.. अशा प्रकारचे उपक्रम घेऊन आपण आपले गाव हिरवेगार करूया असा संदेश सरपंच अजित बोरकर आणि ग्रामविकास अधिकारी विशाल घुले यांनी दिला आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

अजितदादांच्या जयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप :सुरज देवकाते यांचा उपक्रम..!

बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसंपर्क...

गणेशोत्सवात डीजेचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; होलार समाज युवा प्रतिष्ठान व SK GROUP...

दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपक्रमाची सुरुवात; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संपादक : सुरज देवकाते बारामती : गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचा खर्च केवळ...

error: Content is protected !!