Homeसामाजिकसंपदा चौधर यांच्या हस्ते डिजिटल महाराष्ट्र लाईव्ह या न्यूज पोर्टलचे उद्घाटन उत्साहात..!

संपदा चौधर यांच्या हस्ते डिजिटल महाराष्ट्र लाईव्ह या न्यूज पोर्टलचे उद्घाटन उत्साहात..!

रुई येथील बुद्ध विहारामध्ये “डिजिटल महाराष्ट्र लाईव्ह” न्यूज पोर्टलचे उद्घाटन उत्साहात.

Oplus_16908288

निर्भीड, निपक्षपाती पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प.

बारामती : रुई येथील बुद्ध विहारामध्ये “डिजिटल महाराष्ट्र लाईव्ह” या न्यूज पोर्टल व न्यूज चॅनलच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन (दि१७) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. बारामती नगरपालिकेच्या नगरसेविका तथा उपगटनेते संपदा चौधर तसेच प्रा. अजिनाथ चौधर, शरद कांबळे यांच्या हस्ते या न्यूज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगरसेविका संपदा चौधर यांच्या हस्ते फित कापून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी महान व्यक्तींच्या विचारांचा समाजामध्ये प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात प्रास्ताविकानंतर “डिजिटल महाराष्ट्र लाईव्ह” या न्यूज पोर्टल व न्यूज चॅनलचा आकर्षक प्रोमो उपस्थितांना दाखविण्यात आला. पोर्टलच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, स्थानिक घडामोडी, सामाजिक उपक्रम, युवकांचे विषय तसेच विकासकामांना प्राधान्याने प्रसिद्धी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

            यावेळी बोलताना नगरसेविका संपदा चौधर यांनी पत्रकारिता ही समाजाचा चौथा स्तंभ असून माध्यमांनी निष्पक्ष आणि जनहिताची भूमिका घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. डिजिटल माध्यमांच्या युगात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य “डिजिटल महाराष्ट्र लाईव्ह” प्रभावीपणे करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

       प्रा. अजिनाथ चौधर यांनीही समाजातील सकारात्मक घडामोडी, ग्रामीण भागातील प्रश्न आणि सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारिता काळाची गरज असल्याचे नमूद केले. नव्या पिढीपर्यंत सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

          “डिजिटल महाराष्ट्र लाईव्ह” या न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक सुरज देवकाते असून, निर्भीड, निपक्षपाती आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आवाज उठविणारी पत्रकारिता करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण असून उपस्थितांनी “डिजिटल महाराष्ट्र लाईव्ह” या नव्या उपक्रमास शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या उद्घाटन सोहळ्यास सुमित चौधर,  पत्रकार अनिकेत कांबळे, पत्रकार अभिजीत कांबळे, गणेश शेटे, शरद कांबळे,नवनाथ (आबा) चौधर, रत्नदीप कांबळे, रोहित कांबळे, प्रवीण कांबळे, आशु कांबळे, रोहिदास चौधर, नवनाथ कदम, महादेव सोन्ने, सत्यवान चौधर, ऋषिकेश चौधर, लक्ष्मण चौधर, सूत्रसंचालक आप्पासाहेब थोरात, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, युवक वर्ग, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

अजितदादांच्या जयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप :सुरज देवकाते यांचा उपक्रम..!

बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसंपर्क...

गणेशोत्सवात डीजेचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; होलार समाज युवा प्रतिष्ठान व SK GROUP...

दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपक्रमाची सुरुवात; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संपादक : सुरज देवकाते बारामती : गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचा खर्च केवळ...

error: Content is protected !!