Homeताज्या बातम्याजगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत प्रशासनाच्यावतीने स्वागत..!

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत प्रशासनाच्यावतीने स्वागत..!

संपादक : सुरज देवकाते 

बारामती (दि. १५: ) जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे (दि:१५) रोजी बारामती शहरामध्ये ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम..ज्ञानोबा माऊली तुकाराम… च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पाटस रोडवरील देशमुख चौकात प्रशासनाच्यावतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण इंगळे,उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशारे माने, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह नगरसेविका अनुप्रिता डांगे, आरती शेंडगे, संघमित्रा चौधरी, रूपाली मलगुंडे, धनश्री बांदल, मनीषा बनकर, पुनम चव्हाण, सारिका वाघमारे, मंगला किर्वे, प्रतिभा खरात, गोरख पारसे, विष्णू चौधर, सुनील सस्ते, सोमनाथ गजाकस, यशपाल पोटे,राजेंद्र सोनवणे, बिरजू मांढरे, अमोल कावळे, यादी नगरसेवक व विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

नगरपरिषेदेकडून वारकऱ्यांसाठी सुविधा आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  नगरपरिषदेने पूर्वतयारी केली आहे.  शारदा प्रांगण वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  नगर परिषदेच्या प्रांगणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा मार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘ चरण सेवा ‘ तसेच वैद्यकीय सेवा, ग्रामविकास विभागाकडून फुट मसाज करण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी फिरत्या शौचालयाची सोय करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून संपूर्ण शहरात धूर फवारणी करण्यात आली आहे.

‘हरित वारी-सुरक्षित वारी’ च्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. शहरात प्लास्टिकमुक्त बारामती, प्रदूषणमुक्त वारी व पर्यावरण हरित संतुलनासाठी जनजागृतीविषयक उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे  सूचनाही देण्यात येत आहे. बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. काही सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरवण्यात येत आहेत.

या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, आरोग्य विभाग, कौशल्य व उद्योजकता विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, वन विभाग आदी विभागांच्या चित्ररथातून शासनाच्या योजनांविषयी जनजागृती करण्यात येत असून या चित्ररथास वारकऱ्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

error: Content is protected !!