Homeताज्या बातम्यापालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका तासात शहर स्वच्छ; बारामती नगरपरिषदेची अभूतपूर्व कामगिरी...!

पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका तासात शहर स्वच्छ; बारामती नगरपरिषदेची अभूतपूर्व कामगिरी…!

यंदा प्रथमच नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.

संपादक : सुरज देवकाते

बारामती, दि. १६ : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने बारामती नगरपरिषदेने यंदा स्वच्छता, नियोजन आणि व्यवस्थापनाचा नवा आदर्श निर्माण केला. पालखी सोहळ्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्ते, दिंडी मुक्कामस्थळे, सार्वजनिक ठिकाणे आणि पालखी मार्गावरील संपूर्ण परिसराची विशेष स्वच्छता करण्यात आली होती. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.

पालखी शहरात दाखल झाल्यानंतर तसेच शारदा प्रांगण येथे मुक्कामी आल्यानंतर नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, नगरसेवक, मुख्याधिकारी पंकज भुसे आणि अधिकारी वर्ग यांनी गांधी चौक ते गुणवडी चौक या परिसरात प्रत्यक्ष स्वच्छता कामात सहभाग घेतला. त्यांच्या या कृतीमुळे सफाई कर्मचारी आणि अधिकारी यांना मोठे प्रोत्साहन मिळाले आणि संपूर्ण यंत्रणा अधिक जोमाने कामाला लागली.

पालखी मुक्कामासाठी शारदा प्रांगणात पोहोचल्यानंतर नागवडे वस्ती–देशमुख चौक–शारदा प्रांगण हा संपूर्ण पालखी मार्ग अवघ्या एका तासाच्या आत स्वच्छ करण्यात आला. तसेच आज सकाळी पालखीच्या प्रस्थानानंतर शहरातील मुख्य रस्ते, मैदान परिसर, मुक्कामस्थळे आणि पालखी मार्गावरील सर्व भाग पुन्हा केवळ एका तासाच्या आत स्वच्छ करून शहर पूर्ववत करण्यात आले. या कामासाठी नगरपरिषदेचे सुमारे ४५० सफाई मित्र, १८ मुकादम, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. त्यांच्या अथक परिश्रमामुळे पालखी सोहळ्यादरम्यान आणि त्यानंतरही बारामती शहर स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत ठेवण्यात यश आले.

बारामती शहरातून पालखीचे आगमन आणि प्रस्थान या दोन्ही टप्प्यांमध्ये नगरपरिषदेने केलेले नियोजन, स्वच्छता आणि व्यवस्थापन यामुळे वारकरी, भाविक आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. बारामतीच्या स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या परंपरेला साजेसे काम यंदाही नगरपरिषदेने करून दाखवले आहे.

——————————-

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विकास व लोकसेवेच्या परंपरेला साजेसा पालखी सोहळा यंदा पार पडला. मा. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने अभूतपूर्व स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर ठेवले

                  – सचिन सातव

      नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद.

—————————–

बारामती नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत पालखी आगमन आणि प्रस्थानानंतर संपूर्ण शहराची स्वच्छता व सुव्यवस्था अबाधित राखली.”

                  – पंकज भुसे

मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद.

——————————-

“बारामतीच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मोलाच्या योगदानामुळे पालखी सोहळ्यापूर्वी आणि त्यानंतर विक्रमी वेळेत संपूर्ण शहराची स्वच्छता पूर्ण करता आली.

              – नवनाथ बल्लाळ

आरोग्य सभापती, बारामती नगरपरिषद.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे...

संपादक : सुरज देवकाते बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

error: Content is protected !!