ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घ्यावेत महावितरणचे आवाहन..
संपादक : सुरज देवकाते
बारामती : – महावितरणच्या बारामती परिमंडळातील 22 लक्ष 9 हजार ग्राहकांपैकी 9 लक्ष 69 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यात घरगुती वर्गवारीत 19 लक्ष 33 हजार पैकी 8 लक्ष 18 हजार, वाणिजिक्य वर्गवारीत 1 लक्ष 85 हजार पैकी 83 हजार तर औद्योगिक वर्गवारीत 41 हजार 591 पैकी 28 हजार तर पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीत 48 हजार पैकी 39 हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. तरी ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घ्यावेत, असे महावितरणचे आवाहन आहे.
स्मार्ट मीटर म्हणजे अचूक बिल स्मार्ट मीटरमुळे वीज व्यवस्थापन अधिक पारदर्शक, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहे. महावितरणकडून ग्राहकांमध्ये जनजागृती करून स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. बारामती परिमंडळात ठिकठिकाणी ग्राहकांच्या तक्रारी व गैरसमज दूर करण्यासाठी ग्राहक मेळावे, बैठका आयोजित करून जनजागृती केली जात आहे. महावितरणकडून ग्राहकांना स्मार्ट मीटर मोफत बसविण्यात येत आहेत. सध्याचे स्मार्ट मीटर हे पोस्टपेड आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये. स्मार्ट मीटरमुळे बिलिंग जास्त येते हा गैरसमज आहे. याउलट आधुनिक तंत्रज्ञानामुळे मीटरचे रिडिंग स्वयंचलित पध्दतीने होते आहे. परिणामी मानवी हस्तक्षेप टळून ग्राहकांना अचूक व वेळेत बिले मिळत आहेत. ग्राहक मोबाईल ॲपवर वा पोर्टलवर दैंनदिन वीज वापर पाहू शकतात. त्याद्वारे ग्राहकांचे वीज वापरावर थेट नियंत्रण राहिल.शिवाय सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान वीज वापरल्यास प्रति युनिट 85 पैशांची सवलत दिली जात आहे.
मंडळनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे…
बारामती मंडळातील 5 लक्ष 10 हजार ग्राहकांपैकी 2 लक्ष 21 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यात घरगुती वर्गवारीत 4 लक्ष 39 हजार पैकी 1 लक्ष 81 हजार, वाणिजिक्य वर्गवारीत 46 हजार 761 पैकी 23 हजार 173 तर औद्योगिक वर्गवारीत 10 हजार 122 पैकी 6 हजार 265 तर पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीत 13 हजार 800 पैकी 10 हजार 533 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.
सातारा मंडळातील 8 लक्ष 87 हजार ग्राहकांपैकी 3 लक्ष 30 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यात घरगुती वर्गवारीत 7 लक्ष 90 हजार पैकी 2 लक्ष 81 हजार, वाणिजिक्य वर्गवारीत 67 हजार 208 पैकी 26 हजार 823 तर औद्योगिक वर्गवारीत 11 हजार 474 पैकी 7 हजार 858 तर पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीत 18 हजार 147 पैकी 14 हजार 827 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.
सोलापूर मंडळातील 8 लक्ष 12 हजार ग्राहकांपैकी 4 लक्ष 17 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यात घरगुती वर्गवारीत 7 लक्ष 42 हजार पैकी 3 लक्ष 56 हजार, वाणिजिक्य वर्गवारीत 71 हजार 626 पैकी 33 हजार तरऔद्योगिक वर्गवारीत 19 हजार 995पैकी 13 हजार 891 तर पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीत 16 हजार 108 पैकी 13 हजार 862 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















