Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात; नगरसेविका अनुप्रिता डांगे यांची विशेष उपस्थिती..!

विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात; नगरसेविका अनुप्रिता डांगे यांची विशेष उपस्थिती..!

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, बारामती शाखेचा उपक्रम; मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन

संपादक : सुरज देवकाते

बारामती, (दि. २२) : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, बारामती शाखेच्या वतीने दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रात विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार (दि. २१) ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह बारामती नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. अनुप्रिता डांगे यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय पुरंदरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी . उदय रानडे आणि अश्विनीकुमार पत्की यांनी विद्यार्थ्यांना करिअर, स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक बांधिलकी याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात नगरसेविका सौ. अनुप्रिता डांगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव जोपासून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.

संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका अध्यक्ष जगदीश देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. महिला अध्यक्षा सौ. मेधा पळशीकर यांनी प्रास्ताविक करताना युवाशक्तीने संघटनेशी जोडले जाऊन संघटन विस्तारासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी संघटनेच्या विविध पदांसाठी नव्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अष्टपुत्रे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोरकुमार जोशी, सौ. सारिका इंगळे, सौ. विद्या भोयरेकर, सौ. अश्विनी जोशी, केदार सुभेदार, सौ. पल्लवी अभ्यंकर, सौ. योगिता कुलकर्णी तसेच कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

error: Content is protected !!