अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महिला शहराध्यक्ष यांच्या वतीने आयोजन; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन.
प्रतिनिधी : सुरज देवकाते
बारामती, दि. २५ : दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक ६ येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, महिला शहराध्यक्ष उर्मिला म्हेत्रे यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत घाडगे, विद्यार्थी अध्यक्ष मेघराज माने, जनसंपर्क अधिकारी (PRO) सुरज देवकाते, उषा भोसले, सुलताना पठाण, सुनीता मोटे, आशा जगताप, प्रांजल भोसले, आशा जगताप या सह पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी
विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास, शिस्त आणि सामाजिक जाणीव जोपासण्याचा संदेश दिला. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















