Homeताज्या बातम्यामहारक्तदान शिबिरात रक्तदात्यांसाठी यादगार सोशल फाउंडेशनतर्फे स्नेहभोजन; १५०० हून अधिक नागरिकांचा सहभाग..!

महारक्तदान शिबिरात रक्तदात्यांसाठी यादगार सोशल फाउंडेशनतर्फे स्नेहभोजन; १५०० हून अधिक नागरिकांचा सहभाग..!

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवेचा आदर्श उपक्रम; रक्तदात्यांच्या सेवेसाठी कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान.

संपादक : सुरज देवकाते

बारामती ( दि:२१) : दिवंगत उपमुख्यमंत्री तथा विकासपुरुष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महारक्तदान शिबिरात रक्तदात्यांच्या सेवेसाठी यादगार सोशल फाउंडेशनच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला रक्तदाते, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे १५०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.

रक्तदानासारख्या पवित्र कार्यासाठी आलेल्या रक्तदात्यांना भोजनाची उत्तम व्यवस्था करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यादगार सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. रक्तदात्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी यादगार सोशल फाउंडेशनच्या सर्व सभासदांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विशेषतः अन्सारभाई आतार, गणेशभाईजी सोनवणे, छगन आटोळे, सुभाष मोहिते, प्रशांत महाडिक, ओंकार राऊत, ऋषिकेश हराळे, दादा मोडक, इरफान बागवान, अब्रार बागवान, जीशान बागवान, फारूक सय्यद आणि झहीर बागवान यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच अवेसभाई (भटारी) आणि त्यांच्या संपूर्ण टीमने स्वादिष्ट व दर्जेदार भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

युवा नेते जयदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिरात रक्तदात्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग चे फिरोज अजिजभाई बागवान, नगरसेविका सौ. आफ्रीन फिरोज बागवान, माजी नगरसेवक अमजद अजिजभाई बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष किरण इंगळे तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे रक्तदानासारख्या सामाजिक चळवळीला अधिक बळ मिळाले असून, समाजहितासाठी सर्वांनी एकत्र येऊन केलेले कार्य हे इतरांसाठीही प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

error: Content is protected !!