Homeताज्या बातम्याविश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृहाच्या अध्यक्षपदी गणेश सोनवणे यांची बिनविरोध निवड..!

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृहाच्या अध्यक्षपदी गणेश सोनवणे यांची बिनविरोध निवड..!

नवीन कार्यकारिणीची घोषणा; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार..

संपादक : सुरज देवकाते 

बारामती (दि:२६) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृहाच्या कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी गणेश शिवराम सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली वस्तीगृहाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी प्रतिभा संजय मोरे, सचिवपदी धनपाल विश्वनाथ भोसले, सहसचिवपदी सुशीलकुमार सोनवणे आणि खजिनदारपदी विजय नामदेव सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी माजी अध्यक्ष अशोक (अण्णा) सोनवणे, संजय दादा मोरे तसेच दयानंद मिसाळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश शिवराम सोनवणे हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्यामुळे त्यांच्याविषयी समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांचा, संघटन कौशल्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा विचार करूनच त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष गणेश सोनवणे यांनी वस्तीगृहाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, वस्तीगृहातील विविध सोयी-सुविधांमध्ये वाढ करणे तसेच संस्थेची सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे जपण्यासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधवांना विश्वासात घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख व विकासाभिमुख पद्धतीने काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविले जातील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. :::

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसविरोधात एल्गार; उपमुख्यमंत्री सुनेत्रवहिनी पवार यांच्या बाबतच्या वक्तव्याचा तीव्र निषेध.!

संपादक : सुरज देवकाते  बारामती: (दि. ४): राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेत स्थळावरील करण्यात आलेल्या वक्तव्य व त्या वक्तव्याबाबत काँग्रेसच्या...

बारामतीतील भिगवन चौकात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; पृथ्वीराज चव्हाणांचा जाहीर निषेध.. संपादक : सुरज देवकाते बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री...

मांग-गारुडी समाज संघटनेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजाने जपावा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे प्रतिपादन. संपादक : सुरज देवकाते बारामती : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मांग-गारुडी समाज...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

error: Content is protected !!