Homeताज्या बातम्यानिकृष्ट कामांवर सभागृहात संताप; ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची सोमनाथ गजाकस यांची मागणी..!

निकृष्ट कामांवर सभागृहात संताप; ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची सोमनाथ गजाकस यांची मागणी..!

बारामती नगर परिषद सर्वसाधारण सभा संपन्न; ७७ पैकी ७५ विषयांना मंजुरी..!

संपादक : सुरज देवकाते 

बारामती, (दि. १२) : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात शुक्रवारी (दि. १२) नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. नागरिकांशी संबंधित विविध विकासकामे, मूलभूत सुविधा आणि प्रशासकीय विषयांसह एकूण ७७ विषय सभागृहासमोर ठेवण्यात आले. यापैकी ७५ विषयांना मंजुरी देण्यात आली, तर दोन विषयांना नामंजुरी देण्यात आली.

सभेमध्ये शहरातील महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची असलेली समस्या प्रामुख्याने चर्चेत आली. बारामती नगर परिषदेच्या स्थापनेपासून शहरात महिलांसाठी दर्जेदार व सुसज्ज स्वच्छतागृहांची कमतरता असल्याचे नगरसेवक सोमनाथ गजाकस यांनी निदर्शनास आणून देण्यात आले. शहरातील चारही प्रमुख चौकांमध्ये महिलांसाठी आधुनिक व चांगल्या प्रतीची स्वच्छतागृहे तातडीने उभारण्यात यावीत, अशी मागणी सभागृहात गजाकस यांनी मागणी केली. त्याला नगरसेविका अनुप्रिता डांगे यांनी अनुमोदन दिले . यासोबतच महिलांच्या सुविधेसाठी हिरकणी कक्ष सुरू करण्याची मागणी नगरसेवक गणेश जोजारे यांनी केली. या सुविधेमुळे महिलांना व लहान बालकांसह प्रवास करणाऱ्या मातांना मोठा दिलासा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी शहरातील निकृष्ट दर्जाच्या कामांबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्क्या काँक्रिटीकरणामध्ये उभारण्यात आलेले वीज खांब पहिल्याच पावसात कोसळल्याचा मुद्दा नगरसेवक सोमनाथ गजाकस यांनी सभागृहात उपस्थित केला. या घटनेमुळे संबंधित कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

सभेमध्ये नगर परिषदेच्या मालकीच्या गाळ्यांसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान गाळेधारकांचे ऑक्शन न करता त्यांना मुदतवाढ देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे गाळेधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या व्यवसायाच्या सातत्याला मदत होणार आहे.सभेदरम्यान विविध विकासकामे, शहरातील पायाभूत सुविधा, नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बहुसंख्य विषयांना मंजुरी मिळाल्याने अनेक विकासकामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

error: Content is protected !!