Homeताज्या बातम्याबारामती नगर परिषद सर्वसाधारण सभा; ७७ पैकी ७५ विषयांना मंजुरी..!

बारामती नगर परिषद सर्वसाधारण सभा; ७७ पैकी ७५ विषयांना मंजुरी..!

मालमत्ता कर सवलत, नमो उद्यान, हॉकर झोन, ओपन जिमसह विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि:१२) : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात शुक्रवारी (दि. १२) रोजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. सभेमध्ये नागरिकांशी संबंधित विविध विकासकामांसह एकूण ७७ विषय सादर करण्यात आले. यापैकी ७५ विषयांना मंजुरी देण्यात आली, तर दोन विषयांना नामंजुरी देण्यात आली.

सभेच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या वक्तव्याचा सभागृहात जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर विविध लोकहिताच्या विषयांवर नगरसेवकांनी चर्चा करत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. संघमित्रा चौधरी यांनी अनुसूचित जाती-जमाती संदर्भातील विषय सभेपुढे मांडला. तांदुळवाडी येथील सायन्स पार्कच्या विषयास मंजुरी देताना जय पाटील व मनीषा चव्हाण यांनी भूमिका मांडली. बारामती नगरपरिषद शहरातील नॉनमीटर नळ कनेक्शनला मीटर बसवणे या संदर्भातील विषय जय पाटील यांनी हरकत घेतल्यामुळे तो विषय सभेमध्ये नामंजूर करण्यात आला. गरुड बागेतील पार्किंग व्यवस्थेबाबत भारती शेळके यांनी प्रश्न उपस्थित केला. मालमत्ता करात दहा टक्के सवलत देण्याची मागणी जय पाटील, अमोल कावळे, संजय संघवी, निलेश इंगुले आणि आरती शेंडगे यांनी केली. नगरपरिषदेच्या गाळ्यांबाबत निलेश इंगुले यांनी प्रश्न उपस्थित केला, तर घरपट्टी कमीत कमी आकारण्यात यावी, अशी मागणी आरती शेंडगे यांनी केली. शास्ती माफ करण्याचा मुद्दा विष्णुपंत चौधर, सविता जाधव, सुनील सस्ते, प्रसाद खारतोडे आणि संजय संघवी यांनी मांडला. शहरात सर्व महापुरुषांचे पुतळे उभारण्यात यावेत, अशी मागणी नवनाथ बल्लाळ, अश्विनी सातव, प्रतिभा खरात आणि बिरजू मांढरे यांनी केली. वाढीव हद्दीतील

रुई गावातील उघड्या गटारींचा प्रश्न ऐरणीवर..तसेच रुई परिसरात स्मशानभूमी उभारण्याचा मुद्दाही सभेत चर्चिला गेला. रुई गावातील उघड्या गटारी पावसाळ्यामुळे तुडुंब भरून वाहत असून परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची गंभीर बाब संपदा चौधर यांनी सभेच्या निदर्शनास आणून दिली. यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, तसेच रुई येथील डांबरीकरणाचा रस्ता त्वरित मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

वशिष्ठ पूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान उभारण्याचा प्रस्ताव आरती शेंडगे यांनी मांडला. तीन हत्ती चौकाला ‘तिरंगा सर्कल’ असे संबोधण्यात यावे जळोची येथे भव्य  गार्डन करण्यात यावे , टॉयलेटची फेरनिविदा काढावी, जळोची येथील श्रीराम नगर शाळेला 23 गुंठे बक्षीस पत्र दिल्यामुळे त्या शाळेला आजोबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अभिजात जाधव यांनी केली. मुस्लिम समाजासाठी बहुउद्देशीय सभागृह (शादीखाना) उभारण्याची मागणी आफरीन बागवान यांनी केली. शारदा प्रांगण येथील शाळा क्रमांक पाचची जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारण्याचा विषय अभिजीत चव्हाण व आरती शेंडगे यांनी मांडला. शहरातील विविध भागांत ओपन जिम उभारण्याची मागणी दर्शना तांबे, प्रतिभा खरात, मनीषा बनकर, शर्मिला ढवाण, पुनम चव्हाण, गणेश जोजारे, अनुप्रिता डांगे, गोरख पारसे, अमोल कावळे आदींनी केली .

महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी अनुप्रिता डांगे, दर्शना तांबे, गणेश जोजारे, सोमनाथ गजाकस, विशाल हिंगणे, मंगल जगताप, धनश्री बांदल, मंगला किर्वे, रूपाली मलगुंडे आणि विनिता सातकर यांनी केली. अंतर्गत रस्त्यांच्या कामांबाबत राहुल वाघोलीकर यांनी प्रश्न उपस्थित केला. दलित वस्तीतील विकासकामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप अभिजीत चव्हाण यांनी केला. तसेच प्रभागनिहाय सुरू असलेल्या व प्रलंबित कामांचा आढावा घेण्याची मागणी अमर धुमाळ यांनी केली.

बारामती शहरात स्वतंत्र हॉकर झोन उभारण्याचा मुद्दा गणेश जोजारे व राहुल वाघोलीकर यांनी उपस्थित केला. गणेश भाजी मंडईतील गाळेधारकांच्या समस्यांबाबत दर्शना तांबे व अल्ताफ सय्यद यांनी मुद्दा मांडला. फिरते विक्रेते व पदविक्रेते यांच्याकडून होणाऱ्या दैनिक वसुलीबाबत अमर धुमाळ यांनी सभेचे लक्ष वेधले. बुद्ध विहार तसेच विविध महापुरुषांच्या जयंती साजऱ्या होणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण करण्याची मागणी अविनाश निकाळजे यांनी केली. शारदानगर येथील शाळा व बस बारामती नगर परिषदेकडे वर्ग करण्याची मागणी राजेंद्र सोनवणे यांनी केली.

विविध विकासकामे, कर सवलती आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करत सभेतील बहुतांश विषयांना मंजुरी देण्यात आली. शहराच्या विकासास गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

error: Content is protected !!