Homeताज्या बातम्याहातात सलाईन...जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात आक्रमक भूमिका; आरतीताई शेंडगे यांच्या जिद्दीची चर्चा..!

हातात सलाईन…जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात आक्रमक भूमिका; आरतीताई शेंडगे यांच्या जिद्दीची चर्चा..!

प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सभागृहात आक्रमक भूमिका; घरपट्टी कपात, पाणी मीटरला विरोध, शास्ती माफीसह अनेक प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि. १३) : बारामती नगर परिषदेची मासिक सर्वसाधारण सभा आज शरदचंद्रजी पवार सभागृहात उत्साहात पार पडली. सभेमध्ये शहरातील विविध विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा तसेच अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेत्या तथा नगरसेविका आरतीताई शेंडगे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे हाताला सलाईन सुरू असतानाही नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सभेला उपस्थिती लावली आणि विविध विषयांवर आक्रमकपणे भूमिका मांडली.

आरतीताई शेंडगे यांनी शहरातील नागरिकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी घरपट्टीत कपात करण्याची मागणी केली. तसेच थकबाकीवरील शास्ती (दंड) शंभर टक्के माफ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. बारामती शहरात पिण्याच्या पाण्यासाठी मीटर बसविण्याच्या निर्णयालाही त्यांनी तीव्र विरोध दर्शविला. ज्या भागात नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही, त्या भागातील नागरिकांची पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. महावितरणच्या डीपीसाठी नगरपालिकेने तब्बल १५ लाख रुपयांचा खर्च का करावा, असा सवाल उपस्थित करत या खर्चाचा फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरातील गोरगरीब फळ विक्रेत्यांची अधिकृत नोंदणी पूर्ण होईपर्यंत त्यांना व्यवसाय करण्यापासून रोखू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच एनडीके कंपनीने वापरलेल्या वाहनांवर नगरपालिकेचा निधी खर्च करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. विशेष म्हणजे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार सुरू असतानाही आरतीताई शेंडगे यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी सभागृहात हजेरी लावत आपल्या प्रभागातील विविध समस्या ठामपणे मांडल्या. आरोग्याची अडचण असतानाही जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीची जाणीव जपत त्यांनी दाखविलेली कर्तव्यनिष्ठा उपस्थित नगरसेवक आणि नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

बारामती नगर परिषदेच्या आजच्या सभेत विविध विकासकामांबाबत चर्चा झाली असली, तरी हातात सलाईन सुरू असतानाही जनतेच्या प्रश्नांसाठी दाखवलेले समर्पण, जिद्द आणि कर्तव्यभावना यामुळे विरोधी पक्ष नेत्या आरतीताई शेंडगे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या कार्यशैलीची शहरात चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

अजितदादांबद्दल बोललेल्या बेताल वक्तव्याचा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर निषेध; ठरावाला एकमुखी मंजुरी..!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसह सर्व सदस्यांचा एकमुखी पाठिंबा; सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त संपादक : सुरज देवकाते बारामती : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी...

बहुजन समाज पार्टीच्या गटनेत्या ॲड. संघमित्रा काळुराम चौधरी यांच्या पुढाकारातून सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे निर्णय..बारामती...

महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी, अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करू नये..! संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. १३) : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात पार...

बारामती नगर परिषद सर्वसाधारण सभा; ७७ पैकी ७५ विषयांना मंजुरी..!

मालमत्ता कर सवलत, नमो उद्यान, हॉकर झोन, ओपन जिमसह विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१२) : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात...

error: Content is protected !!