Homeताज्या बातम्याअजितदादांबद्दल बोललेल्या बेताल वक्तव्याचा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर निषेध; ठरावाला एकमुखी मंजुरी..!

अजितदादांबद्दल बोललेल्या बेताल वक्तव्याचा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर निषेध; ठरावाला एकमुखी मंजुरी..!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसह सर्व सदस्यांचा एकमुखी पाठिंबा; सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त

संपादक : सुरज देवकाते

बारामती : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. सभेच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधाचा विषय सभागृहात उपस्थित करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोद विशाल हिंगणे यांनी निषेधाचा ठराव मांडला.या ठरावास नगरसेवक सोमनाथ गजाकस यांनी अनुमोदन देत हात वर करून संबंधित घटनेचा निषेध व्यक्त केला. सभागृहातील सदस्यांनीही या निषेध ठरावाला पाठिंबा दर्शवत एकमुखी मंजुरी दिली.

यावेळी आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत, अजितदादा पवार यांच्याविषयी अपशब्दांचा वापर झाल्याबद्दल जाहीर निषेध नोंदविला. तसेच बांधकाम सभापती अमर धुमाळ यांनीही संबंधित वक्तव्याचा निषेध करत आपली भूमिका स्पष्ट केली. सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांसह इतर सदस्यांनीही निषेध ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला. त्यामुळे सभागृहात संबंधित वक्तव्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, सभेच्या सुरुवातीलाच हा विषय चर्चेला आल्याने काही काळ वातावरण गंभीर झाले होते. मात्र, सर्व सदस्यांनी एकमताने निषेध व्यक्त करत सभेचे पुढील कामकाज नियमितपणे सुरू ठेवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

error: Content is protected !!