Homeताज्या बातम्याबारामतीत प्रथमच ‘टायटॅनिक’ थीमवरील भव्य प्रदर्शन; टायटॅनिकची ऐतिहासिक सफर आता बारामतीत..!

बारामतीत प्रथमच ‘टायटॅनिक’ थीमवरील भव्य प्रदर्शन; टायटॅनिकची ऐतिहासिक सफर आता बारामतीत..!

जगप्रसिद्ध टायटॅनिकची कहाणी प्रत्यक्ष अनुभवण्याची सुवर्णसंधी

संपादक : सुरज देवकाते

बारामती, (दि:१८) – बारामतीकरांसाठी इतिहास, मनोरंजन आणि आधुनिक आकर्षणांचा संगम असलेले भव्य ‘टायटॅनिक एक्सिबिशन’ (प्रदर्शन) प्रथमच बारामतीत सुरू होत असून, नागरिकांना जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. डी.जे. अम्युझमेंट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विकसित बारामतीत हे प्रदर्शन भरविण्यात येत असून, यापूर्वीही त्यांच्या सहकार्यामुळे विविध उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले होते. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, प्रदर्शनात टायटॅनिक जहाजाची ऐतिहासिक प्रतिकृती आणि त्या संदर्भातील माहिती पाहण्याची संधी मिळणार आहे.

प्रदर्शनामध्ये १४ एप्रिल १९१२ रोजी घडलेल्या टायटॅनिक दुर्घटनेचा इतिहास, त्या काळातील माहिती, कलाकृती आणि विविध मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. इतिहासप्रेमींसह विद्यार्थी, पर्यटक आणि कुटुंबांसाठी हा अनुभव संस्मरणीय ठरणार आहे. याशिवाय, प्रदर्शनात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी विविध मनोरंजनात्मक राईड्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये जायंट व्हील, कोलंबस, भूत बंगला, ब्रेक डान्स, सलांबी, ड्रॅगन ट्रेन, पेडल बोट, जंपिंग, मिनी ट्रेन यांसारख्या रोमांचक राईड्सचा समावेश आहे. मुलांसाठी खेळणी, विविध वस्तू, फॅशन साहित्य, जीवनशैली उत्पादने, गृहपयोगी साहित्य आणि इतर अनेक स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत. खाद्यप्रेमींसाठी प्रदर्शनात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. पॉपकॉर्न, कॉटन कँडी, पाणीपुरी, चाट, चिली गोडी, मिरची भजी, आईस्क्रीम, दिल्ली अप्पलमसह अनेक चविष्ट पदार्थांची रेलचेल असणार आहे. तसेच कुटुंबासोबत आठवणी जपण्यासाठी आकर्षक फोटो पॉइंट्सही उभारण्यात आले आहेत.

“मजा, ज्ञान, इतिहास आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असलेले हे प्रदर्शन नागरिकांनी आवर्जून पाहावे. विद्यार्थी, पर्यटक आणि संपूर्ण कुटुंबासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे प्रदर्शन डी.जे. अम्युझमेंट्सचे सी.के. दिनेशकुमार व सी.के. जयप्रकाश यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले असून, व्यवस्थापक रवी एन. नायर, के.के. जयराज आणि संतोष जाधव यांनी पत्रकार परिषदेत प्रदर्शनाची माहिती दिली.

हे प्रदर्शन क्रोमा शोरूमजवळ, स्वातंत्र्यसैनिक संभाजीराव गालिंदे नगर, सहयोग सोसायटीसमोर, भिगवण रोड, बारामती येथे भरविण्यात आले असून, बारामतीकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!