Homeताज्या बातम्याअजितदादा पवारांबाबतच्या वक्तव्याबद्दल माफी; पक्षाच्या सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा देणार..दादा प्रेमींच्या भावना...

अजितदादा पवारांबाबतच्या वक्तव्याबद्दल माफी; पक्षाच्या सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा देणार..दादा प्रेमींच्या भावना दुखावल्याबद्दल उद्या अजितदादा पवार यांच्या अपघातस्थळी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करून आत्मक्लेश करणार :- किशोर मासाळ

रोहित पवार यांच्या सोशल मीडिया टीमकडून माझ्याविरोधात काम केले जात आहे.”

संपादक: सुरज देवकाते

बारामती (दि :७)सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल नगरसेवक किशोर मासाळ यांनी जाहीर माफी मागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तसेच या घटनेचे प्रायश्चित्त म्हणून अजितदादा पवार यांच्या अपघातस्थळी उद्या एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करण्याचाही निर्णय त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्या हातून अजितदादा पवार यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य झाले. या वक्तव्यामुळे बारामतीकरांसह राज्यभरातील अजितदादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाचे प्रायश्चित्त म्हणून सोमवार, दि. ९ जून रोजी सकाळी ८.४५ वाजल्यापासून अजितदादा पवार यांच्या अपघातस्थळी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करून आत्मक्लेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच दि. ७ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रसिद्धीपत्रकात त्यांनी पवार कुटुंबाविषयी आपली निष्ठा कायम असल्याचे सांगितले आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी दाखल न करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. तसेच सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोणताही गुलाल उधळला जाणार नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नगरसेवक पदाच्या राजीनाम्याच्या मागणीवरही त्यांनी भाष्य केले. स्थानिक नगरपालिकेतील निवडणुका व शहरातील राजकीय समीकरणांचा विचार करून काहीजण राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आपल्या विरोधात सोशल मीडियावर ट्रोलिंग होत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.याशिवाय स्वतःविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा उल्लेख करताना त्यांनी न्यायप्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून आपण तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रसिद्धीपत्रकामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून आगामी काळात या प्रकरणाचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“रोहित पवार यांच्या सोशल मीडिया टीमकडून माझ्याविरोधात काम केले जात आहे.” “मला ट्रोल करणारे ९० टक्के अकाउंट्स शरद पवार गटाचे, म्हणजेच रोहित पवार यांच्या सोशल मीडिया टीमचे आहेत.” त्यांनी असेही म्हटले आहे की, जर त्यांच्या (किशोर मासाळ) राजीनाम्याची मागणी केली जात असेल, तर रोहित पवार यांनीही अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन जाहीर करावे की ते किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही अजितदादा पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तीविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार नाही. तसेच, प्रसिद्धीपत्रकात किशोर मासाळ यांनी रोहित पवार पडद्यामागून राजकीय भूमिका बजावत असल्याचा आरोप केला असून, आपल्या विरोधातील सोशल मीडिया मोहिमेमागे त्यांचे समर्थक असल्याचा दावा केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे...

संपादक : सुरज देवकाते बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

error: Content is protected !!