Homeताज्या बातम्यादिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव;...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सन्मान..!

वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यास विद्यार्थी-पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती

प्रतिनिधी : सुरज देवकाते

बारामती (दि:१२) दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा २०२५-२६ मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा बारामती येथील शहर राष्ट्रवादी कार्यालय, शारदा प्रांगण येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत अधिक मेहनत घेऊन राज्य व देशपातळीवर यश संपादन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  किरण इंगळे, मा. महिला शहराध्यक्षा सौ. अनिता गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या रेहाना शेख, उपाध्यक्ष संतोष टाटिया,  प्रमुख उपस्थिती म्हणून  शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष (पुणे) भीममसिंग डुमरे, पत्रकार सुरज देवकाते, सोशल मीडिया अध्यक्ष अमोल लेंढे, पत्रकार मन्सूर शेख,पत्रकार साधू बल्लाळ  उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करताना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख बारामती सौ. मंदाकिनी ज्ञानेश्वर माने तसेच सामाजिक कार्यकर्त्या रेहाना शेख मॅडम यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रम प्रसंगी सुनिता मोटे, उर्मिला मैत्री,रेश्मा ढोबळे,सुलताना पठाण,उषा भोसले, सोनाबाई काळे,प्रांजल भोसले यादी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

error: Content is protected !!